Chhaava Movie Advance Booking: आगामी चित्रपट ‘छावा’ रिलीज होण्यापूर्वीच मालामाल झाला आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून, चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे. छावाच्या अॅडव्हान्स कलेक्शनबद्दल आणि त्याच्या शोबद्दल जाणून घेऊ.
हायलाइट्स:
- छावा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
- छत्रपती संभाजी महाराजांवर हा सिनेमा आधारित आहे
- छावा सिनेमात विकी कौशलची प्रमुख भूमिका आहे.
एका दिवसातच मालामाल झाला छावा
९ फेब्रुवारी २०२५ रोजी, निर्मात्यांनी ‘छावा’ चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे. थिएटरची तिकीट खिडकी उघडताच तिकिटांची विक्री वेगाने सुरू झाली. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सॅक्निल्कच्या मते, छावाची आतापर्यंत एका दिवसात ८१९९१ तिकिटे विकली आहेत. एवढी तिकिटे विकून, छावा सिनेमाने आपल्या खात्यात सुमारे २.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.
छावाला किती शो मिळाले
छावा सिनेमाला एकूण ५५६५ शो मिळाले आहेत, त्यापैकी हिंदी २डी ला ५४४४, हिंदी आयमॅक्स २डी ला ६१, हिंदी ४डीएक्स ला ५१ आणि हिंदी आयसीई ला ९ शो मिळाले आहेत. एकूण मिळून, छावाचे संपूर्ण भारतात ५५६५ शो लागणार आहेत. हा सिनेमा नक्कीच कोट्यवधी रुपये कमावले. छावाची अॅडव्हान्स तिकिटे ४ दिवस आधी ज्या वेगाने विकली जात आहेत ते पाहता, त्याची चांगली ओपनिंग होऊ शकते असे गृहीत धरता येते.
अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच छावा सिनेमा मालामाल, विकी कौशलच्या सिनेमाची रिलीजआधीच एवढी कमाई
छावाची कथा आणि कलाकार
छावाची कथा मराठा साम्राज्याचे धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे, तर रश्मिका मंदान्ना संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबचे पात्र सांकारुन खलभूमिकेत पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे तर निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे.