Chhaava Advance Booking Collection Day 1: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असणारा ‘छावा’ सिनेमा अवघ्या काही तासातच प्रदर्शित होईल. १४ फेब्रुवारी रोजी रीलिज होणाऱ्या या सिनेमाच्या पहिल्या दिवसासाठी आगाऊ बुकिंगमध्ये तगडी कमाई झाली आहे.
हायलाइट्स:
- ‘छावा’ सिनेमाची जबरदस्त कमाई
- आगाऊ बुकिंगमध्ये कमावले कोट्यवधी
- ओपनिंग डे ला मोडणार रेकॉर्ड
रीलिजआधी होणाऱ्या बुकिंगसाठी ‘छावा’ सिनेमाकडे अजून गुरुवारचा पूर्ण दिवस शिल्लक आहे. त्यामुळे अशी अपेक्षा केली जातेय की, या बुकिंमधून ‘छावा’ ११ ते १२ कोटींची कमाई करेल. परिणामी ७ फेब्रुवारी रोजी रीलिज झालेल्या ‘सनम तेरी कसम’ला तगडी टक्कर पाहायला मिळेल.
‘छावा’चे आगाऊ बुकिंग
गुरुवारी सकाळपर्यंत ‘छावा’च्या ११४७८ शोसाठी ३ लाख २५ हजार ६७८ तिकिटांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. यामध्ये २डी, IMAX आणि ४डीएक्स शो समाविष्ट आहेत. यातून झालेली ग्रॉस कमाई ९.२३ कोटी रुपये आहे.
‘छावा’ मोडणार ६ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड
‘छावा’ सिनेमाचे बजेट १३० कोटी रुपये आहे. एवढ्या मोठ्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेला ६ वर्षांपूर्वी रीलिज झालेल्या ‘गल्ली बॉय’चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत बॉलिवूडच्या इतिहासात व्हॅलेंटाइन डेला सर्वाधिक कमाई ‘गल्लीबॉय’ने २०१९ साली केली होती, या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई १९.४० कोटी रुपये होती. ‘गल्ली बॉय’चे अॅडव्हान्स बुकिंगही ९ कोटी रुपये होते. ‘छावा’ने तर हा टप्पा आधीच पार केला आहे, त्यामुळे ओपनिंग डेची कमाई ‘गल्ली बॉय’चा रेकॉर्ड ब्रेक करणारी ठरू शकते. असा अंदाज वर्तवला जातो आहे की, पहिल्या दिवशी ‘छावा’ची २०-२२ कोटी रुपये कमाई होऊ शकते.