'छावा' सिनेमाच्या वादळात 'सनम तेरी कसम' गाठणार ५० कोटीचा टप्पा? ९ दिवसात झाली एवढी कमाई

Sanam Teri Kasam Rerelease Box Office Collection Day 9: ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाने ९ दिवसात किती कोटींची केली कमाई?

हायलाइट्स:

  • ‘सनम तेरी कसम’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
  • ९ दिवसात कोट्यवधींची कमाई
  • हर्षवर्धन राणे-मावरा होकेनचा सिनेमा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांचा २०१६ साली रीलिज झालेला ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट अलीकडेच पुन्हा एकदा रीलिज करण्यात आला. जे बॉक्स ऑफिस कलेक्शन ९ वर्षांपूर्वी या चित्रपटाला मिळाले नव्हते, ते आता रीरीलिजनंतर मिळाले आहे. २०१६ मध्ये हा चित्रपट फ्लॉप ठरला होता, पण २०२५ मध्ये रीरीलिजचे विविध रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत. जाणून घ्या ९ दिवसात किती झाली कमाई?

‘छावा’ सिनेमाच्या रीलिजनंतर चित्र बदलले

७ फेब्रुवारी २०२५ रोजी हा सिनेमा पुन्हा रीलिज करण्यात आला आणि सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच दणक्यात कमाई केली. १४ फेब्रुवारीपासून मात्र हे चित्र बदललेले दिसले, कारण या दिवशी विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमा रीलिज झाला आहे. ‘छावा’ सिनेमाचे वाढते शो आणि लोकप्रियता पाहता ‘सनम तेरी कसम’ची कमाई काही प्रमाणात घसरली आहे. असे असले तरी चाहत्यांकडून अंदाज वर्तवला जातोय की, हा चित्रपट ५० कोटीचा आकडा पार करेल.

‘सनम तेरी कसम’ने रीलिजच्या पहिल्या दिवशी ५.१४ कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली होती. १५ फेब्रुवारी रोजी शनिवारी या सिनेमाची कमाई केवळ १ कोटीच्या आसपास झाली आहे. आता रीलिजनंतर ९ दिवसांनी ही कमाई ३४.२९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सिनेमाच्या टीमकडून याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यावर चाहत्यांनी कमेंट करत हा सिनेमा ५० कोटीचा आकडा गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान जेव्हा २०१६ साली हा चित्रपट रीलिज झाला होता, तेव्हा या चित्रपटाने फक्त ९ कोटींचा गल्ला कमावलेला आणि सिनेमाला फ्लॉप ठरवण्यात आलेले. मीडिया रिपोर्टनुसार ‘सनम तेरी कसम’चे बजेट २५ कोटी रुपये आहे आणि रीरीलिजची कमाई बजेटपेक्षा किती तरी जास्त आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे दुमदुमली थिएटर्स, पहिल्याच दिवशी छावाची बंपर कमाई, विकी कौशलच्या नावे ६ रेकॉर्ड

‘छावा’ सिनेमाची जबरदस्त कामगिरी

विकी आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने रीलिजच्या पहिल्या दिवशी ३३.१ कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या दिवशी ही कमाई ३९.३ कोटींवर पोहोचली आहे. पहिल्या रविवारी (१६ फेब्रुवारी) या कमाईत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. अवघ्या दोन दिवसात या सिनेमाचे भारतातील कलेक्शन ७२.४ कोटी झाल्याने, तिसऱ्या दिवशीच १०० कोटींचा टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

sanam teri kasam rerelease box office collectionvicky kaushal chhaava movie releaseछावा विकी कौशलछावा सिनेमा बॉक्स ऑफिस कलेक्शनमावरा होकेन हर्षवर्धन राणेसनम तेरी कसमसनम तेरी कसम बॉक्स ऑफिस कलेक्शनहर्षवर्धन राणे सनम तेरी कसम
Comments (0)
Add Comment