Sikandar Box Office Collection Day 3: सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘सिकंदर’ चित्रपटाने तीन दिवसामध्ये बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली?
हायलाइट्स:
- तिसऱ्या दिवशी कमी झाली ‘सिकंदर’ची कमाई
- सलमान खानच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
- ३० मार्च रोजी रीलिज झाला आहे चित्रपट
तिसऱ्या दिवशी ‘सिकंदर’च्या कमाईत घसरण झाली असली तरी हा सिनेमा सिंगल स्क्रिनवर हाऊसफुल होतो आहे. चाहते सोशल मीडियावर सलमान खानवरचे त्यांचे प्रेम व्यक्त करतायंत आणि भाईजानचा सिनेमा पाहून आनंदी होत आहेत. समीक्षकांकडून या चित्रपटावर टीका करण्यात आली, तरीही चाहते सलमान खानच्या सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. सलमानचा हा सिनेमा पुढील १-२ दिवसात १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री करेल असा अंदाज वर्तवला जातो आहे.
ईद आणि सलमान खानचा सिनेमा हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळाले आहे, मात्र गेल्या वर्षी ईदला त्याचा कोणताही सिनेमा रीलिज झाला नव्हता. त्यावेळी अक्षय कुमारचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि अजय देवगणचा ‘मैदान’ रीलिज झाला. चाहत्यांनी या दोन्ही चित्रपटांना म्हणाला तसा प्रतिसाद दिला नाही, परिणामी या चित्रपटांनी अनुक्रमे ६० कोटी आणि ५१ कोटींची कमाई केली. ईदनिमित्ताने सलमानच्या सिनेमाची चाहत्यांना प्रतिक्षा होती. सिनेमाला मिळालेले रीव्ह्यू चांगले नसले तरी ‘सिकंदर’ने ७० कोटींचा टप्पा पार केला आहे.