'छावा'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; ८ ब्लॉकबस्टर सिनेमांना पछाडलं, 'सिकंदर'लाही चारली धूळ

Chhaava Box Office Collection : बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत ‘छावा’ने एकामागून एक मोठे विक्रम मोडले आहेत. आज या चित्रपटाने सिकंदरसमोर ८ मोठे रेकॉर्ड मोडले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – ‘स्त्री २’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या मॅडॉक फिल्म्स बॅनरला कदाचित माहित नसेल की त्यांचा आगामी चित्रपट ‘छावा’ देखील ब्लॉकबस्टर होईल, पण ते घडलं आहे. विकी कौशल-रश्मिका मंदाना यांचा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये चालत असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. सलमान खानचा सिकंदर प्रदर्शित झाला होता, त्याआधी मोहनलालचा एल२ एम्पुरान प्रदर्शित झालेला. पण हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊनही ‘छावा’ची कमाई अजूनही इतकी आहे की या सिनेमाला अद्भुत म्हणणं चुकीचं ठरणार नाही. बॉक्स ऑफिसवर शानदार ५० दिवस पूर्ण केल्यानंतर, हा चित्रपट आज ५१ व्या दिवशी व्यवसाय करत आहे. आज चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत, तर चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया.

अधिकृत आकडेवारीनुसार, छावाने ७ आठवड्यात हिंदीतून ५९४ कोटी कमावले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, हिंदी भाषेत चार आठवड्यांनंतर प्रदर्शित झालेल्या तेलुग भाषिक सिनेमाने तीन आठवड्यात १५.८७ कोटींची कमाई केली. म्हणजेच ७ आठवड्यात चित्रपटाची एकूण कमाई ६०९.८७ कोटी रुपयांवर पोहोचली. ५० व्या दिवशी चित्रपटाची कमाई ५५ लाख होती, तर आज म्हणजेच ५१ व्या दिवशी सकाळी १०:३५ वाजेपर्यंत ही कमाई ९० लाखांपर्यंत वाढली आहे. आतापर्यंत एकूण कमाई ६११.३२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सॅकनिल्कवर उपलब्ध असलेले हे आकडे सध्या अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.

‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; ८ ब्लॉकबस्टर सिनेमांना पछाडलं, ‘सिकंदर’लाही चारली धूळ

शाहरुखच्या ‘जवान’ने ५१ व्या दिवशी फक्त ५ लाख आणि पठाणने २५ लाख कमावले. त्याचप्रमाणे, अ‍ॅनिमलने १३ लाख रुपये आणि स्ट्री २ ने फक्त ५ लाख रुपये कमावले. अल्लू अर्जुनच्या मेगाब्लॉकबस्टर ‘पुष्पा २’ ने ५१ व्या दिवशी हिंदी आवृत्तीतून फक्त १८ लाखांची कमाई केली. सनी देओलच्या गदर २ बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने ८ व्या आठवड्यात एकूण ५५ लाखांची कमाई केली आहे, जी छावाने आधीच मागे टाकली आहे.
IPL स्टार क्रिकेटरच्या EX बायकोची होणार खतरों के खिलाडीमध्ये एण्ट्री, दुसरा नाव तर अगदीच शॉकिंग
याशिवाय, KGF चॅप्टर २ ची ८ व्या आठवड्यात सर्व भाषांमधील एकूण कमाई ८८ लाख रुपये झाली आणि कल्की २८९८ एडीने ५१ व्या दिवशी ६ लाख रुपये कमावले. म्हणजेच ‘छावा’ने ५१ व्या दिवशी ८ ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.आणखी वाचा

Source link

chhaava movie box office collectionchhaava movie box office collection day 51sikandar movie box office collectionvicky kaushal chhaava movieछावा बॉक्स ऑफिस कलेक्शनछावा सिनेमासिंकदरसिंकदर सिनेमा
Comments (0)
Add Comment