Chhaava Movie Box Office Collection : एकीकडे, सिकंदर बॉक्स ऑफिसवर रेंगाळत आहे, तर दुसरीकडे, विकी कौशलच्या चित्रपटाने ५२ व्या दिवशी १० मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार, छावाने हिंदी आणि तेलुगूमध्ये ७ आठवड्यात ६०९.८७ कोटी रुपये कमावले आहेत. तेलुगू आवृत्तीची कमाई फक्त ३ आठवड्यांपासून आहे. कारण, ‘छावा’ हा चित्रपट हिंदी आवृत्तीच्या रिलीजच्या चार आठवड्यांनंतर तेलुगूमध्ये प्रदर्शित झाला होता.
५० व्या आणि ५१ व्या दिवशी चित्रपटाने अनुक्रमे ५५ लाख आणि ९० लाख रुपये कमावले. म्हणजेच चित्रपटाने ६११.३२ कोटी रुपये कमावले होते. आता जर आपण सिनेमाच्या ५२व्या दिवसाच्या कमाईवर नजर टाकली तर सकाळी १०:३५ वाजेपर्यंत चित्रपटाने १.३० लाखांची कमाई केली होती आणि चित्रपटाची एकूण कमाई ६१२.६२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चीच हवा; विकी कौशलने रचला इतिहास, १० मोठे विक्रम काढले मोडीत
छावाने १० मोठे विक्रम मोडीत काढले
‘छावा’ने रिलीजच्या ५२ व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांना मागे टाकलं आहे. यापैकी काही चित्रपटांची ८ व्या आठवड्यातील एकूण कमाई ‘छावा’च्या कालच्या कमाईपेक्षा कमी आहे. गदर २- ५५ लाख (एकूण ८ व्या आठवड्याची कमाई) RRR- ८० लाख (आठव्या आठवड्यात हिंदी आवृत्तीची संपूर्ण कमाई) ऍनिमल – २० लाख (५२ व्या दिवसाची कमाई) जवान – १३ लाख (५२ व्या दिवसाची कमाई) पुष्पा २- ४५ लाख (सर्व भाषांमधील ५२ व्या दिवसाची कमाई) स्त्री २- ९० लाख (५२ व्या दिवसाची कमाई) पठाण – २० लाख (५२ व्या दिवसाची कमाई) कल्की – ६ लाख (सर्व भाषांमधील ५२ व्या दिवसाची कमाई) बाहुबली २- १.४ कोटी.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अक्षय खन्ना, डायना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत.