गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील १० वर्षीय मुलीला तीन दिवसांपासून भूक न लागणे, पोट दुखणे, उलटी होणे असा त्रास होत होता. यामुळे तिच्या वडिलांनी तिला तिरोडा येथील बालरोगतज्ज्ञांना दाखवलं. डॉक्टरांनी त्या मुलीची सोनोग्राफी करायला सांगितलं. तेव्हा पोटात काहीतरी वेगळी वस्तू असल्याचं कळलं. यामुळे त्यांनी तिला पुढील उपाचारासाठी गोंदिया येथील खासगी व्दारका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील बालरोग शल्यचिकिसत्सक डॉ. विभु शर्मा यांच्याकडे पाठवले.
डॉ. शर्मा यांनी मुलीची तपासणी केली असता त्यांनी तिच्या पोटाचे सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. या सिटीस्कॅनदरम्यान पोटात केसांचा गुच्छा असून तो आतड्यात गुंतलेला असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी या मुलीच्या वडिलांकडे विचारणा केली. तेव्हा मुलींच्या वडिलांनी सांगितलं की, ती लहानपणी केस खायची. परंतु आता तिने केस खाणं बंद केलं आहे.
यावर डॉ. शर्मा यांनी त्या मुलीची शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे असल्याचे मुलीच्या पालकांना सांगितलं. शस्त्रक्रिया करताना मुलीच्या जीवाला पण धोका होऊ शकतो, असंही डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाला सांगितलं होत. परंतु सुदैवाने त्या मुलीचे प्राण वाचले आहेत.
शिवरायांची तुलना एका बेईमान व्यक्तीशी, मंगल प्रभात लोढांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांनी सुनावलं