सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसानं राज्यात उसंत दिल्यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस जरी थांबला असला तरी कोल्हापूरात पूरस्थिती कायम आहे. अनेक नद्या अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहेत. चिपळूण, महाडमध्ये पूराचं पाणी ओसरलं असलं तरी चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. रायगडमध्ये ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळं मोठी जिवितहानी झाली आहे. पावसानं उसंत दिल्यामुळं मदतकार्याला वेग आला आहे.
Live Update
- सांगली: कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फुटांवर; शहरात अनेक भागात शिरलं पाणी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही कोकणात;खेड, चिपळूणच्या नुकसानीची करणार पाहणी
- देवेंद्र फडणवीस, नारायण राणे कोकणच्या दौऱ्यावर; चिपळूण, खेड परिसराची पाहणी करणार
वाचाः सोशल मीडियावर दिखाऊ अस्तित्व; मदतीचा आकांत करणाऱ्यांना प्रतिसादच नाही
- पंचगंगा नदीची पाणी पातळी ५२ फुटांवर; जिल्हाला काही अंशी दिलासा
- अर्धे सांगली पाण्यात; एक लाख पूरग्रस्तांचे स्थलांतर
- शिरोळ तालुक्यात ४५ हजार जणांचे स्थलांतर
- एनडीआरएफ, लष्कराकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
वाचाः दहशतीच्या दरडींखाली! रायगड जिल्ह्यात ८५, तर साताऱ्यात १२ जण अद्याप बेपत्ता