एसटी कर्मचाऱ्यांचं ठरलं, विलीनीकरणाच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलनाच्या हालचाली

मुंबई: ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप हा प्रचंड गाजला होता. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी शेवटपर्यंत लावून धरली होती. त्यासाठी एसटी कर्मचारी जवळपास सहा महिने मुंबईच्या आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते. या काळात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे ठाकरे सरकार कोंडीत सापडले होते. त्यानंतर विलीनकरणाचे गाडे पुढे न सरकल्याने एसटी कर्मचारी पु्न्हा एकदा संप करण्याच्या तयारीत आहेत.

शिंदे सरकारकडून एसटी महामंडळाच्या निधीला कात्री, सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार?

सांगली जिल्ह्यातील सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर या संघटनेचे अध्यक्ष असून, आधीच्या एसटी संपात त्यांनी पुढाकार घेतला होता. आता हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवसापासून बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संघटनेने जाहीर केली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात एसटी आंदोलनाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. गेल्यावेळच्या एसटी आंदोलनावेळी ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले होते. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात एसटी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित झाल्यास महाविकास आघाडी कशाप्रकारे आक्रमक होणार, हे पाहावे लागेल.

एसटीचा प्रवासदर्जा उंचावणार; चार वर्षात सात हजार गाड्या वाढणार, असा असेल आराखडा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. मार्च २०२२मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास सुरुवात केली. संपकाळात पगाराविना आर्थिक संकटापुढे टिकाव न धरू शकलेल्या८०हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. जवळपास चार महिने एसटी सेवा ठप्प होती. तरीही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी मान्य झाली नव्हती. परंतु, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांची वाढ केली होती.

Source link

maharashtra assembley winter session 2022msrtc employeesmsrtc employees agitationmsrtc strikeShinde-Fadnavis govtst strike in maharashtraएसटी आंदोलनएसटी संप
Comments (0)
Add Comment