गुरुवर्य नामदेव आप्पा शामगावकरांचं निधन; अंत्यसंस्कारावेळी अख्खं गाव धाय मोकलून रडलं

सातारा : ह.भ.प. गुरुवर्य नामदेव आप्पा शामगांवकर हे व्यक्तिमत्व ग्रामीण महाराष्ट्रातील हजारो लोकांना माहितीय. आज नव्वदी पार केलेले हे किर्तनकार गेल्या ६५ वर्षांपासून किर्तनातून समाजप्रबोधनाचं काम करत होते. लहानपणी माळावर गुरे राखताना रस्त्यानं पंढरीला जाणारी दिंडी पाहिली आणि ते गुरे तिथेच सोडून पंढरीला गेले. शेकडो किर्तनं ऐकली, ग्रंथ वाचले, पाठ केले आणि किर्तनकार होऊनच परत आले. ही आप्पांच्या आयुष्याची कथा. मात्र, आप्पा आता काळाच्या पडद्याआड गेलेत. आप्पांनी या जगातून, आपल्या शिष्यांचा अखेरचा निरोप घेतला. अशा सर्वांच्या लाडक्या आप्पांनी शेवटचा श्वास घेतलाय. मंगळवारी दिनांक. १३/१२/२०२२ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आप्पांनी शेवटचा श्वास घेतला.

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेलं आप्पांचं गाव शामगांव. आप्पा फक्त अवघी तिसरी शाळा शिकलेले, पण त्यांच्या किर्तनातून त्यांनी कमावलेली भाषा ऐकताना आप्पा एवढी कमी शाळा शिकलेत असं वाटायचं नाही. ७० वर्षांपूर्वी बोलली जाणारी मराठी कशी होती? हे आप्पांच्या कीर्तनातून कळायचं. आप्पांची भाषा आणि कथनशैलीवर प्रचंड अभ्यास होता. तरुणपणी किर्तनासाठी सायकलीवरून फिरले आणि मैलौ-मैल गेले आणि हे यश संपादन केलं

विवाह समन्वय समितीवरून हुसेन दलवाईंचा सरकारवर मोठा आरोप, कडाडून विरोध करत म्हणाले…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून ते अगदी सामान्य माणसांनी त्यांची कीर्तन ऐकली आहेत. राज्य मार्ग ७६ मसूरवरून रायगावला जाताना शामगाव फाटा येतो तेच आप्पांचं गाव. शतकापूर्वीच्या नोंदी वाचताना याच भागात कधीकाळी पुसेसवळीच्या शाहिरांचे पोवाडे आणि चोराडेंच्या कलाकारांचा कलगी तुरा रंगला. त्यानंतर काही वर्षांनी आप्पाची कीर्तने लोकप्रिय झाली होती. आर्थिक परिस्थितीने थोडे गरीब पण समृद्ध सांस्कृतिक परंपरा निर्माण करणारे म्हणजे ‘आप्पा’.

नामदेव आप्पांना आपल्या उभ्या आयुष्यात खूप पुरस्कार मिळाले. कीर्तन केसरी, वारकरी रत्न, वारकरी भूषण, असे खूप सारे पुरस्कार आप्पांना मिळाले. तसेच खान्देशात देखील त्यांचे चांगलेच वर्चस्व होते. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील श्रीराम. वाघाडी बू ता. शिंदखेडा हे संपुर्ण गाव त्यांचे जास्त आवडीचे होते. पूर्ण गावाचे ते गुरु व पूर्ण गाव त्यांचे शिष्य होते. वारकरी परंपरा व संत वान्ड्मय काय आहे हे त्यांनी सर्वांना सोपे करुन सांगितले. मात्र, दोन दिवसांपूर्वी आप्पा हे जग सोडून गेले. अंत्यसंस्करावेळी त्यांच्या गावासह त्यांच्या आवडीचे म्हणजेच वाघाडी हे गाव देखील धाय मोकलून रडत होतं.

डुक्कर विष्णूचा अवतार, त्याचा दात पाण्यात ठेवून मुलींना पाजा, कालीचरण महाराजांचा अजब सल्ला

Source link

guruvarya namdev appa shamgaonkar deathmaharashtra marathi newssatara local newssatara newsगुरुवर्य नामदेव आप्पा शामगावकर निधनमहाराष्ट्र मराठी बातम्यासातारा बातम्यासातारा स्थानिक बातम्या
Comments (0)
Add Comment