ग्रामपंचायत निवडणुकीत बाकी देवले, इंदोरी, कुणेनामा, वरसोली, निगडे आणि सावळा येथे राष्ट्रवादीने आपला सरपंच बसवला आहे. या शिवाय बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचा येथे सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे मावळची निवडणूक विशेष महत्वाची ठरली आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचे वर्चस्व वाढू लागल्याचे चित्र आता निर्माण होऊ लागले आहे.
क्लिक करा आणि वाचा- चार दिवस सासूचे…; सुनेकडून सासू पराभूत, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या पॅनलला धक्का
मावळ तालुक्यात भाजपच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीकडून सुरुंग लावला गेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचा मोठ्या फरकाने विजयी मिळवला होता. तसेच देहू नगरपालिकेवर देखील राष्ट्रवादीने बाजी मारली होती.
भाजपकडून या निवडणुकीसाठी आपली ताकत पणाला लावली होती. कारण अनेक आजी-माजी आमदारांनी येथे येऊन प्रचार केला होता.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंवर पहिल्यांदाच झाले भूखंड घोटाळ्याचे आरोप, आरोप फेटाळत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
मावळ तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनू लागला आहे. त्याची सुरुवात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून झाली. त्यामुळे मावळ तालुक्यात आता भाजपला लोक नाकारत असून राष्ट्रवादीला पसंती देत असल्याचे पहायला मिळत आहे. याबाबत आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, जनतेने ज्या लोकप्रतिनिधींनी कामे केली त्यांनाचा कौल दिला आहे, तसेच कुठल्याही भूलथापांना बळी न पडता हा निकाल दिला असून तीच आमची पावती असल्याचे शेळके म्हणाले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- ग्रामपंचायतीतील पराभव सहनच झाला नाही, पराभूत उमेदवारांमध्ये राडा; एकास मारहाण