जगावर आलेल्या नव्या करोना संकटाचा महाराष्ट, मुंबईला किती धोका? एका क्लिकवर सर्व अपडेट

मुंबई : विदेशात मागील आठवड्यापासून करोनाचा कहर वाढू लागला आहे. रुग्णालयात रुग्ण भरतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर १२ डिसेंबरपासून ७७ टक्के लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. ओमिक्रोनचा व्हायरस जगभरात पसरला असल्याची माहिती आहे. चीनमध्ये ८० टक्के लोकांना ओमिक्रोनचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चीनमध्ये अचानक आलेली ही करोनाची लाट एप्रिलपर्यंत टिकू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच ३ लाख लोकांचा यात मृत्यू होऊ शकतो अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

भारताची स्थिती काय?

मागील २४ तासात भारतात १२९ करोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात एकाच मृत्यू झाला आहे. तर भारतात ३४०८ करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात काय आहे कोविड-१९ ची स्थिती?

महाराष्ट्रात दर आठवड्यातला करोना रुग्ण संख्येत ३० टक्क्यांची कमी येत आहे. १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात १४६ रुग्णांची नोंद झाली. त्याआधीच्या आठवड्यात महाराष्ट्रात ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान २०४ केसेस आढळल्या.

हेही वाचा – चीनमुळे जगभरात करोनाचा पुन्हा हाहाकार, भारताला किती धोका? जाणाकारांनी दिलं थेट उत्तर

मुंबईतील सध्याची परिस्थिती

मुंबईत मागील ८ दिवसांपासून १० पेक्षा कमी करोना रुग्ण आढळत आहेत. १५ डिसेंबर ते २१ डिसेंबरपर्यंत एकट्या मुंबईत ३७ नवे कोविड-१९ रुग्ण आढळले. तसंच ८ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत मुंबईत ६९ करोना रुग्णांची नोंद झाली.

Covid-19 Update

महाराष्ट्रात आतापर्यंत ८१,३६,३९८ केसेस आढळल्या असून त्यापैकी १,४८,४१२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ७९,८७,८५१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं. आज महाराष्ट्रात करोनाचे ३० अॅक्टिव्ह रुग्ण असून एकाचाही मृत्यू झालेला नाही.

हेही वाचा – चार्ल्स शोभराजची जेलमधून होतेय सुटका; भारतासह ९ देशांना डोकेदुखी ठरला होता बिकिनी किलर

मुंबईत आज ८ रुग्ण असून एकही मृत्यू झालेला नाही. एकट्या मुंबईत आतापर्यंत ११,५४,१४२ रुग्ण आढळले. त्यापैकी १९,७४५ जणांचा मृत्यू झाला. तर ११,३५,२८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

जगभरात आलेल्या नव्या करोनाच्या लाटेमुळे भारतातही यासाठीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळा संपण्याआधी करोना रुग्णांची संख्या वाढल्यास राज्याने प्लॅन ऑफ अॅक्शन तयार ठेवण्याचं म्हटलं आहे.

राज्यभरात लाखो कोविड चाचण्या घेतल्या जात असताना, आता ही संख्या हजारोंच्या घरात आहे. मेट्रोपोलिस लॅबचे डॉ. नीलेश शहा म्हणाले की, एका वर्षापूर्वीच्या तुलनेत संपूर्ण भारतात चाचणीची संख्या कमी झाली आहे. कोविडची परिस्थिती सध्या चिंताजनक नाही. आधीच्या करोना लाटेदरम्यान लोक ताप आल्यानंतर लगेचच कोविड चाचणीसाठी गर्दी करायचे, परंतु आता ही परिस्थिती नाही.

Source link

Coronavirus In Indiacoronavirus new variantCovid New Variantcovid new variant mumbaicovid omicron variantcovid variants in indiamaharshtra covid-19 updatemumbai covid-19 updatemumbai maharashtra covid-19 updateomicron bf7 subvariant
Comments (0)
Add Comment