अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण, पोलिसांनी असा लावला छडा; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बाळाचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आलं आहे. अपहरण झाल्यानंतर १२ दिवसांनी पोलिसांना बाळाचा शोध लागला. त्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भूपेश भुवन पटेल असे अपहरण झालेल्या बाळाचं नाव आहे. विजय अनंतर जयस्वाल आणि सुमन शर्मा अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत. त्यांनी १० डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवरून मुलाचे अपहरण केले होते. पोलिसांनी या दोघांना रांजणगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

जयंत पाटलांचं निलंबन, शरद पवार यांचा थेट अजित पवार यांना फोन, म्हणाले….

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात उदनिर्वाहासाठी आलेलं एक दाम्पत्य त्यांच्या मूळगावी झारखंड येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. या दाम्पत्याबरोबर त्यांचा अडीच वर्षाचा मुलगाही बरोबर होता. प्लॅटफॉर्मवर सरकत्या जिन्यालगत रात्री साडे-आठ वाजण्याच्या सुमारास अपहरणकर्ते त्यांच्याजवळ आले. त्यांच्याशी गप्पा मारू लागले. महिलेने तिच्याजवळील खाऊ मुलाला खाण्यास दिला.

या दरम्यान मुलाबद्दल आपल्याला जिव्हाळा आहे, असे दाखवून ते दोघे त्या बाळाला आणखी खाऊ आणतो म्हणून घेऊन गेले. मात्र, परत न आल्याने मुलाच्या आई-वडिलांनी याबाबत रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. लोहमार्गचे पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अक्षिक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिअधिक्षक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोज खोपीकर, स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्गाचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

मुलाच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्गाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलींद झोडगे यांच्या नेतृत्वात सात तपास पथके तयार करण्यात आली होती. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील चौकांचे व संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी या पथकांनी केली. त्याचप्रमाणे शहरातील ७८ लॉज, हॉटेल्सवर छापे मारण्यात आले. तसेच ११० विक्रेत्यांकडील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. तपासात पोलिसांना माहिती मिळाली की, बालकाचे एका महिलेने तिच्या साथीदारासह अपहरण केले आहे. त्यासाठी त्यांनी रिक्षाचा वापर केला आहे. या माहितीनुसार अपहरणकर्तेच्या तांत्रिक हालचाली व सोशल मीडियावरील हालचालींचा वेध घेऊन मुलाचा शोध घेण्यात आला.

आजच्या IPL लिलावात पडणार पैशांचा पाऊस, अजिंक्य राहणे ते बेन स्टोक्स या स्टार खेळाडूंवर असणार नजर

Source link

Pune crime newspune kidnapping newspune latest marathi newspune railway station child kidnappingपुणे अपहरण बातम्यापुणे क्राईम बातम्यापुणे ताज्या मराठी बातम्यापुणे रेल्वे स्टेशन मुलाचं अपहरण
Comments (0)
Add Comment