मावळमध्ये कोसळला पूल; अनेक गावांचा संपर्क तुटला

हायलाइट्स:

  • पवना नदीवरील थुगाव-बौर पूल कोसळला
  • पूल ढासळल्याने अनेक गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर
  • वाढत्या अंतरामुळे नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार

लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना नदीवरील थुगाव-बौर पूल कोसळला आहे. गतवर्षी पवना नदीला आलेल्या महापुरात या पुलाच्या दोन ते तीन मोऱ्यांचा बराच भाग वाहून गेला होता. यामुळे हा पूल वाहतुकीस धोकादायक झाला होता. अखेर धोकादायक झालेला हा ५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला पूल ढासळल्याने या परिसरातील अनेक गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला असून अनेक गावांना जोडणाऱ्या या पुलामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

बौर गावच्या हद्दीत वेंकटेश्वरा कंपनीची कुक्कुट पालन व कुक्कुट चिकनचे विविध प्रकारचे फुड उत्पादन करणारी वेंकीज ही कंपनी आहे. या कंपनीतील बहुतांश कामगार हे या पुलावरून कंपनीत कामाला जात होते. पूल ढासळल्याने या कामगारांना कामावर जाण्यासाठी काही किलोमीटर अंतरावरून वळसा घालून जावे लागणार आहे.

Raj Thackeray: तर मनसेत अजिबात प्रवेश करू नका!; राज ठाकरे असं कुणाला म्हणाले पाहा

या पुलापासून वेंकीज कंपनी अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. मात्र थुगाव गाव आणि परिसरातील गावातील कामगारांना यापुढे ७ ते ८ किलोमीटर वळसा घालून कंपनीत कामावर जावे लागणार असल्याने त्यांना इंधनाच्या दृष्टीने आर्थिक व वाढत्या अंतरामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, गतवर्षी पुलाचा भाग ढासळून पूल धोकादायक झाल्यामुळे नवीन पूल उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र तो उभारला न गेल्याने अखेर जीर्ण व धोकादायक थुगाव-बौर पूल आज सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान कोसळला आहे.

Source link

Bridge collaped in PunelonavalaMavalपूल कोसळलामावळलोणावळा
Comments (0)
Add Comment