Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- पवना नदीवरील थुगाव-बौर पूल कोसळला
- पूल ढासळल्याने अनेक गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर
- वाढत्या अंतरामुळे नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार
बौर गावच्या हद्दीत वेंकटेश्वरा कंपनीची कुक्कुट पालन व कुक्कुट चिकनचे विविध प्रकारचे फुड उत्पादन करणारी वेंकीज ही कंपनी आहे. या कंपनीतील बहुतांश कामगार हे या पुलावरून कंपनीत कामाला जात होते. पूल ढासळल्याने या कामगारांना कामावर जाण्यासाठी काही किलोमीटर अंतरावरून वळसा घालून जावे लागणार आहे.
या पुलापासून वेंकीज कंपनी अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. मात्र थुगाव गाव आणि परिसरातील गावातील कामगारांना यापुढे ७ ते ८ किलोमीटर वळसा घालून कंपनीत कामावर जावे लागणार असल्याने त्यांना इंधनाच्या दृष्टीने आर्थिक व वाढत्या अंतरामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, गतवर्षी पुलाचा भाग ढासळून पूल धोकादायक झाल्यामुळे नवीन पूल उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र तो उभारला न गेल्याने अखेर जीर्ण व धोकादायक थुगाव-बौर पूल आज सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान कोसळला आहे.