शिंदेंचं आधी कटआऊट लागलं नंतर फडणवीसांचं लागलं, सगळीकडे ऊंचीची चर्चा, इनसाईड स्टोरी वेगळीच

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण करेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सत्तेबाहेर काढण्याचं काम केलं. खरंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती पण उलटं घडलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकारबाहेर राहणार असल्याची घोषणा करुन केंद्रीय नेतृत्त्वाच्या आदेशानं उपमुख्यमंत्री बनले. नव्या सरकारच्या काळातील पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्यांवरुन गाजतंय, हे सर्व सुरु असताना अधिवेशन संपण्यास केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. याचवेळी नागपूरमध्ये दोन कटआऊट्सवरुन चर्चा रंगलीय. सध्या एकनाथ शिंदे यांचं कटआऊट लहान आणि देवेंद्र फडणवीस यांचं कटआऊट मोठं अशी चर्चा सुरु आहे. पण, या बातमी मागची बातमी मात्र वेगळीच आहे.

काय आहे प्रकरण?
एकनाथ शिंदे याचं कटआऊट छोटं आणि देवेंद्र फडणवीसांचं मोठं अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर अशा कालावधीमध्ये घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. दोन्ही नेत्यांचे कटआऊट्स सध्या चर्चेत आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्याकडे संसदीय कार्य मंत्रिपद आहे. त्यांचा एक फोटो समोर आला आहे. तो फोटो १२ डिसेंबरचा असल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी तिथं फक्त एकनाथ शिंदे यांचं कटआऊट होतं. हे कटआऊट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि किरण पांडव यांच्याकडून लावण्यात आलं होतं. पुढील सहा दिवस एकच कटआऊट दिसत होतं.

नातवाला वाचवण्यासाठी आजीसह डॉक्टरांचा संघर्ष, जे जे शक्य होतं ते केलं,अखेर जे नको तेच घडलं,सारे हळहळले

एकनाथ शिंदे यांचं एकट्याचं कटआऊट
खरंतर सरकारचं नेतृत्व शिंदे फडणवीस करत असले तरी नागपूरमध्ये एकनाथ शिंदे यांचे एकट्याचे कटआऊट्स लावण्यात आले होते. पुढच्या सहा दिवसांच्या काळात परिस्थिती जशीच्या तशी होती. शिंदे यांच्या कटआऊटवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो देखील दिसतात. आता एकनाथ शिंदे यांच्या कटआऊटच्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचं भलं मोठं कटआऊट लावलेलं दिसून येतं. हे कटआऊट नेमकं कुणी लावलं हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, ते एकनाथ शिंदे यांच्या कटआऊटच्या आकारापेक्षा मोठं आहे.

पाहा फोटो

एकट्या शिंदेंचं कट आऊट ते दोघाचं कट आऊट असा प्रवास

शरद पवार यांनी काँग्रेसबाबत केले मोठे विधान, म्हणाले, मतभेद असतीलही पण…

शिंदे यांच्या कटआऊटवर श्रीकांत शिंदे आणि किरण पांडव यांचं नाव आहे. पण, देवेंद्र फडणवीस यांचं कटआऊट कुणी लावलं हे समजत नाही, त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं मोठं कटआऊट लावण्यामागचं नेमकं राजकीय गणित येणाऱ्या काळात नक्की समजेल. मात्र, या प्रकरणात सुरुवातीला फक्त एकनाथ शिंदे यांचं कटआऊट होतं. नंतरच्या काळात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं कटआऊट लावण्यात आलं ते देखील मोठ्या आकाराचं त्यामुळं शिंदे फडणवीस यांच्यात संबंधाबाबत चर्चा होऊ लागली आहे.

‘लवासा’ प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात; पवार, सुळेंविरोधात सीबीआय चौकशीचा आदेश देण्याची विनंती

Source link

Devendra FadnavisDevendra Fadnavis Cut Outdevendra fandnavisEknath ShindeEknath Shinde Cut Outeknath shinde newsMaharashtra politicsmaharashtra politics newsmaharashtra winter session
Comments (0)
Add Comment