Maharashtra politics | वाशिम जिल्ह्यातील गायरानासाठी आरक्षित ३७ एकर जमीन नियमित करण्याचे आदेश अब्दुल सत्तार यांनी दिले होते. हा आदेश दिवाणी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध होता. त्यामुळे अब्दुल सत्तार अडचणीत सापडले होते. या मुद्द्यावरुन हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची प्रचंड कोंडी झाली होती. यानंतर अब्दुल सत्तार यांनी स्वपक्षीयांच्या हेतूविषयी शंका व्यक्त केली आहे.
हायलाइट्स:
- अब्दुल सत्तारांना कोणत्या नेत्यावर संशय?
- हिवाळी अधिवेशनात अब्दुल सत्तारांची विरोधकांकडून कोंडी
मी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी काही गोष्टींवर चर्चा केली होती. मात्र, या चर्चेतील काही गोष्टी विपर्यास होऊ बाहेर आल्या. मी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना योग्य माहिती दिली आहे. एखाद्या गुप्त बैठकीतील तपशील बाहेर कसे येऊ शकतात, याबाबत मी त्यांच्याकडे तक्रार केली आहे. मी एक लहानसा कार्यकर्ता आहे. पण आम्ही विरोधी पक्षनेत्यांची चौकशी करायची ठरवली तर त्यांना तोंड लपवायला जागा उरणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे सगळी माहिती आहे. मी टीईटी परीक्षा घोटाळ्यात सहभागी असेन तर मला सुळावर चढवा, असे मी यापूर्वीच सांगितल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
मंत्रिपद न मिळालेल्या नेत्याचाच माझ्याविरोधात कट
यावेळी अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटातील एका नेत्यावर गंभीर आरोप केले. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या माझ्याच पक्षातील नेता माझ्यावरोधात कट रचत असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षातही माझे अनेक हितचिंतक आहेत. माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला कृषी खात्यासारखे महत्त्वाचे खाते कसे मिळाले, या गोष्टीचा अनेकांना धक्का बसला आहे, असे सत्तार यांनी म्हटले.
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटातील तो नेता कोण, याची जोरदार चर्चा रंगली आहे. तो औरंगाबाद जिल्ह्यातीलच आहे की मग जिल्ह्याबाहेरील आहे. याचीच चर्चा जोरात सुरु झाली आहे.
महोत्सवासाठी कृषी विभाग वेठीस
सिल्लोडमधील कृषी महोत्सवाच्या आयोजनाच्या मुद्द्यावरुनही अब्दुल सत्तार वादात सापडले होते. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे १ जानेवारी ते १० जानेवारी या काळात कृषी-कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या सिल्लोड महोत्सवासाठी आर्थिक मदत राज्यभरातून गोळा करण्याचे आदेश सत्तर यांनी दिल्याची माहिती समोर आली होती. यासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रवेशिका खपवण्याचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, यावरुन गदारोळ होताच अब्दुल सत्तार यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विक्री झालेल्या प्रवेशिका परत मागवण्यात आल्याची चर्चा होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.