ज्या दिवशी उर्फी माझ्या हातात सापडेल, त्यादिवशी…., चित्रा वाघ यांचा इशारा

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी असे चाळे आम्ही चालू देणार नाही. टोकाची भूमिका घेऊ, शेवटपर्यंत लढा देऊ, पण उर्फीला धडा शिकवू. तिच्यावर कारवाई करण्यासाठी मी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलीये. आता तरीही उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार, असा इशाराच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे.

चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लिखित पत्राच्या माध्यमातून विचित्र कपडे परिधान करत मुंबईतील रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फी जावेदबद्दल तक्रार केली आहे. ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली. चित्रा वाघ यांना उत्तर देताना उर्फीचा तोल गेला. या राजकारण्यांना काही खरी कामं नाही आहेत का?, अशी विचारणा करताना उर्फीने चित्रा वाघ यांना शिवीही हासडली. आता उर्फीच्या प्रत्युत्तरानंतर चित्रा वाघ यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

एका मातेची लेक अत्याचाराला बळी पडली, त्या मातेने मला उर्फीचा एक व्हिडीओ पाठवला. ती कोण बाई (उर्फी) आहे, हे ही मला माहिती नव्हतं. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यावर मी हैरान झाले. मुंबईच्या रस्त्यावर असे उघडे नागडे व्हिडीओ पाहिले … व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना मला विचारायचंय, तुम्हाला लाज वाटत नाही का? स्वातंत्र्याच्या नावाखाली किती स्वैराचार माजवलाय हा…चार भिंतीच्या आत तुम्ही उघडे नागडे नाचा… आम्हाला काही देणंघेणं नाही. पण ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने वागणार तर आम्ही तुम्हाला त्याच ठिकाणी प्रसाद देणार… आज मी ट्विट करुन कारवाईची मागणी केलीये. ज्या दिवशी ती माझ्या हातात सापडेल त्यादिवशी मी तिला थोबडवणार म्हणजे थोबडवणार..”

देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा

केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करावी, अशा आशयाचं पत्र चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना लिहिलं आहे.

उर्फीचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

“माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आणखी एका पोलिसांच्या तक्रारीने झाली आहे. या राजकारण्यांना काही खरी कामं नाही आहेत का? या राजकारण्यांना, वकिलांना कळत नाही का? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही ज्यानुसार ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील. माझे निप्पल व व्हजायना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही. तुम्हाला फक्त मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. चित्रा वाघ, मी तुम्हाला आणखी चांगल्या कल्पना देते, तुम्ही सेक्स ट्रॅफिकिंग विरुद्ध काम करा, अवैध डान्स बारवर बंदी आणा, अवैध देहविक्री व्यवसायावर बंदी आणा, या सर्व समस्या मुंबईत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या”.

Source link

Chitra Waghchitra wagh on urfi javedurfi javedउर्फी जावेदचित्रा वाघ
Comments (0)
Add Comment