या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी सतीश आणि पीडित तरुणी दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघेही एकाच गावातील आहेत. पीडितेचं कुटुंब शहरात वास्तव्यास आहे, तर पीडिता ही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. आरोपी सतीशचे पीडितेवर एकतर्फी प्रेम आहे. त्यामुळे तो गेल्या अनेक महिन्यापासून पीडितेला त्रास देत होता. यापूर्वी देखील आरोपी पीडितेच्या घरी गेला होता. त्यावेळी आरोपी सतीशची पीडितेच्या आईने समजूत काढली होती. मात्र तरी देखील तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडितेने पोलिसांची मदत घेतली होती.
पोलिसांनी आरोपीला समज दिली होती. आता मात्र आरोपी त्रास देणार नाही असे पीडित तरुणीला वाटत होते. त्यामुळे ती नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला जाण्यासाठी म्हाडा कॉलनी परिसरातील रोजगार कार्यालयाजवळ उभी होती. दरम्यान तेथे कंपनीची बस आली आणि पीडित तरुणी बसमध्ये चढत असताना आरोपी सतीशने पीडितेचा हात धरून तिला खाली ओढले व शरीरसुखाची मागणी केली. या धक्कादायक प्रकारामुळे पीडिता घाबरली आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.