तुम्हीदेखील २०२४ मध्ये तुरुंगात जायची तयारी ठेवा; संजय राऊतांचा केसरकरांना इशारा

Maharashtra Politics | संजय राऊत यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार दीपक केसरकर यांना चोख प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी पुन्हा तुरुंगात जायची तयारी करावी, असे केसरकरांनी म्हटले होते. त्यावर राऊत यांनी म्हटले की, तुम्ही म्हणजे न्यायालय किंवा कायदा नाही. असं असेल तर दीपक केसरकर यांनीही २०२४ साली तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असा इशारा राऊतांनी दिला.

 

दीपक केसरकर आणि संजय राऊत

हायलाइट्स:

  • वंचित-ठाकरे गटाच्या युतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध?
  • आम्ही महाविकास आघाडीतील सगळ्यांना युतीची कल्पना दिली आहे
  • ठाकरे गट आणि वंचितची युती होणार
मुंबई: मी महाराष्ट्र आणि माझ्या पक्षासाठी पुन्हा तुरुंगात जायलाही तयार आहे. मी दीपक केसरकर यांच्यासारखा पळपुटा आणि लफंगा नाही. तुम्ही म्हणजे न्यायालय किंवा कायदा नाही. असं असेल तर दीपक केसरकर यांनीही २०२४ साली तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांनी दिलेल्या इशाऱ्याविषयी विचारणा करण्यात आली. संजय राऊत यांनी पुन्हा तुरुंगात जायची तयारी करावी, असे केसरकर यांनी म्हटले होते. त्यावर संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शैलीत प्रत्युत्तर दिले. मी आता तुरुंगात जायला तयार आहे, पण मग केसरकरांनीही २०२४ मध्ये तुरुंगात जाण्यास तयार राहावे, असे राऊत यांनी म्हटले.
Sanjay Raut: शिंदे गट म्हणजे टोळी, असल्या टोळ्या गँगवॉर नाहीतर एन्काऊंटरमध्ये मारल्या जातात: संजय राऊत
यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीसंदर्भात भाष्य केले. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात चर्चा सुरु आहे. ठाकरे गट आणि वंचितमधील युतीच्या चर्चेची महाविकास आघाडीला पूर्ण कल्पना आहे. आम्ही महाविकास आघाडीला सर्वकाही अधिकृतपणे सांगितलेले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे वंचित-ठाकरे गटाच्या युतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध असेल, असे वाटत नाही. महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी शक्ती प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली एकटवली आहे. त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून कोणी विरोध करेल असे वाटत नाही. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीसोबत आल्यास ती परिवर्तनाची नांदी ठरेल. सध्या केंद्रात आणि राज्यात ज्याप्रकारचे सत्ताकारण सुरु आहे, ते उलथवून लावण्यासाठी शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र येणे गरजेचे आहे.आम्ही त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
भाजप १४४ आमदार निवडून आणणार असेल तर शिंदे गटाचे लोक धुणीभांडी करायला ठेवलेत का?: संजय राऊत

ठाकरे गट सोडेल तितक्या जागांवर लढण्यास वंचित तयार: प्रकाश आंबेडकर

वंचित’चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट आमच्यासाठी जेवढ्या जागा सोडेल, तेवढ्या जागांवर लढण्यास आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने BMC निवडणुकीत ८३ जागांवर उमेदवार उभे करायचे ठरवले होते. मात्र, आता ठाकरे गटाशी युती झाल्यामुळे ते जितक्या जागा सोडतील, त्या जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवेल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Deepak Kesarkareknath shinde campMaharashtra politicsmumbai local newsSanjay Rautthackeray camp vba allianceदीपक केसरकरसंजय राऊत
Comments (0)
Add Comment