आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ जानेवारी २०२३ : शाकंभरी पौर्णिमा,शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Jan 2023, 11:38 am

Daily Panchang : शुक्रवार ६ जानेवारी २०२३, भारतीय सौर १६ पौष शके १९४४, पौष पौर्णिमा उत्तररात्री ४-३७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आर्द्रा रात्री १२-१३ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा,

 

आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ जानेवारी २०२३ : शाकंभरी पौर्णिमा,शुभ मुहूर्त आणि शुभ योग
राष्ट्रीय मिती पौष १६, शक संवत् १९४४, पौष, शुक्ल, पौर्णिमा, शुक्रवार, विक्रम संवत् २०७९. सौर पौष मास प्रविष्टे २२, जमादि-उल्सानी-१३, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ६ जानेवारी २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटापर्यंत. पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी ४ वाजून ३८ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. आर्द्रा नक्षत्र दुपारी १२ वाजून १४ मिनिटापर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ.

ब्रह्म योग सकाळी ८ वाजून १० मिनिटे त्यानंतर ऐंद्र योग प्रारंभ. विष्टि करण दुपारी ३ वाजून २७ मिनिटे त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र मिथुन राशीत राहील.

सूर्योदय:

सकाळी ७-१४,

सूर्यास्त:

सायं. ६-१५,

चंद्रोदय:

सायं. ५-४५,

चंद्रास्त:

सकाळी ६-४२,

पूर्ण भरती:

सकाळी ११-२७ पाण्याची उंची ३.४९ मीटर, रात्री १२-३१ पाण्याची उंची ४.३६ मीटर,

पूर्ण ओहोटी:

सकाळी ६-०५ पाण्याची उंची २.०५ मीटर, सायं. ५-३५ पाण्याची उंची ०.८१ मीटर.

दिनविशेष:

शाकंभरी पौर्णिमा , शाकंभरी नवरात्री समाप्ती, पत्रकार दिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :

अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ५० मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३३ मिनिटे ते ३ वाजून २५ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५३ मिनिटे ते ७ वाजून १५ मिनिटापर्यंत. अमृत काळ मध्‍यरात्री १ वाजून १७ मिनिटे ते २ वाजून ५८ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजून २२ मिनिटापर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५० मिनिटे ते १ वाजून ४१ मिनिटापर्यंत. ज्वालामुखी योग सकाळी ८ वाजून ९ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ३ वाजून ४८ मिनिटापर्यंत.

आजचे उपाय :

पाच लाल फूल आणि हळदीने माखलेल्या पाच कवड्या लक्ष्मीमातेला अर्पित करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 6 january 2023आजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२शाकंभरी पौर्णिमाशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment