Raj Thackeray Vs Sharad Pawar | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी सकाळीच कोल्हापूरात बोलताना राज ठाकरे यांना चिमटा काढला होता. त्यानंतर पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांचा दाखल देत एक मिश्कील टिप्पणी केली. मी कधीतरी उठून राजकारणाबाबत बोलतो, असे शरद पवार म्हणतात. पण त्यासाठी एक कारण असल्याचे राज यांनी सांगितले.
हायलाइट्स:
- पुण्यातील जागतिक मराठी संमेलनात राज ठाकरेंची मुलाखत
- राज ठाकरेंनी काढला पवारांना शाब्दिक चिमटा
- सध्याच्या राजकारणाचा दर्जा ढासळलाय
यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सध्या महापुरुषांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादासंदर्भात भाष्य केले. जातींमध्ये तेढ निर्माण करून त्यामध्ये महापुरुषांना खेचणे, हे राजकारण नव्हे. सध्याच्या काळात कोणालाही वाटायला लागलंय की, मी इतिहासतज्ज्ञ आहे. हे सर्वजण कोणताही विचार न करता बोलत असतात. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही सुरु आहे. येथील राजकारण लयाला गेले आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
या कार्यक्रमापूर्वी रविवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरे यांना टोला हाणला. राज ठाकरे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीयवादाच्या राजकारणाला सुरुवात झाली, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी अलीकडच्या काळात अनेकदा केले आहे. यावरुन शरद पवार यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे नेतृत्त्व कोणत्या नेत्यांकडे होते, हे पाहावे. सुरुवातीच्या काळात छगन भुजबळ यांनी पक्षाचं नेतृत्त्व केले. त्यानंतर विविध समाजातील नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्त्व केले. मुळात आमच्या मनात जातीपातीचा विचार येतच नाही. आम्ही शाहू-फुले-आंबेडर यांच्या विचारांचे लोक आहोत. त्यामुळे आम्ही राज ठाकरे यांच्या टीकेची फारशी दखल घेत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
…त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं; पवारांचा राज ठाकरेंना टोला
एखादी व्यक्ती सहा महिन्यात मत व्यक्त करते ते गांभीर्यानं घेण्यासारखं नाही. मला सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचायची सवय आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. अनेकजण वृत्तपत्रात काय लिहिलंय हे न वाचता वक्तव्य करत असेल तर मी त्यांना दोष देणार नाही, असा टोला शरद पवार यांनी मध्यंतरी राज ठाकरेंना लगावला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.