शरद पवार माझ्यावर टीका करतात, पण ‘या’ कारणामुळे मी राजकारणावर सतत बोलणे टाळतो: राज ठाकरे
यावेळी राज ठाकरे यांना गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बडे उद्योग गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने अग्रेसर आहे. जे आहे ते जरी टिकवलं तरी महाराष्ट्र पुढे आहे. त्यामुळे एखाद दुसरा उद्योग बाहेर गेल्याने काही फरक पडत नाही. परंतु, आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यावर आता भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंचा शरद पवारांनी एका वाक्यात निकाल लावला, म्हणाले….
महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा ढासळतोय: राज ठाकरे
राज्यातील सध्याची राजकीय स्थिती लयाला गेली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची एकूण परिस्थिती उद्विग्न करणारी आहे. त्यामुळे मी महिने-दोन महिने राजकारणावर बोलतच नाही. नारायण राणे किंवा संजय राऊत एकमेकांवर काय टीका करतात, याच्याशी लोकांना काय देणघेणं आहे. त्यामुळे मी राजकीय परिस्थितीवर बोलणे टाळतो. परिणामी मी अनेक दिवस राजकारणाबाबत बोलतच नाही. जातींमध्ये तेढ निर्माण करून त्यामध्ये महापुरुषांना खेचणे, हे राजकारण नव्हे. सध्याच्या काळात कोणालाही वाटायला लागलंय की, मी इतिहासतज्ज्ञ आहे. हे सर्वजण कोणताही विचार न करता बोलत असतात. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही सुरु आहे. येथील राजकारण लयाला गेले आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.