उद्धव ठाकरेंच्या रक्तातच ही गोष्ट नाही; ते फक्त सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले- बावनकुळे

जालना : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी मुंबई महापालिकेबाबत मोठा दावा केला आहे. ‘मुंबई महानगरपालिकेमध्येही शिंदे फडणवीस सरकार येईल. तसं झाल्यास मुंबई शहराला आंतराष्ट्रीय दर्जाचे स्थान आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही’, असं बावनकुळे म्हणाले. विरोधातील काही आमदार भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. बहुमत सिद्ध करायचं झालं तर आमचे १८४ आमदार भरतील, असाही दावा बावनकुळे यांनी केला. ते जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जालना शहरातील सरस्वती भुवन प्रशालेत विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. यातील अनेक कामे महाविकास आघाडीने पूर्वनियोजित केल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

‘विकास कामं ही उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाहीत. ते फक्त सोन्याचा चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलू नये. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काळात जनतेसाठी काहीच विकास कामे केली नाहीत. आमदारांच्या पत्रावरही ते सही करायचे नाहीत. तर ते विकास कामे कशी काय करू शकतात? ते विकासाचे बोलतात तेव्हा या गोष्टीचं मला वाईट वाटतं. त्यांनी कधीच मातोश्रीच्या बाहेर पाऊल ठेवले नाही. त्यांनी जो विकास केला तो कंत्राटदारांना पोसण्याचा विकास केला’, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

चौथ्यांदा नापास झाल्याने अखेर पोलीस बडतर्फ, पोलीस अधीक्षकांची एका कर्मचाऱ्यावर कारवाई

मुंबईमध्ये सांडपाण्याची व्यवस्था तुम्ही का केली नाही? महाराष्ट्रात मी अनेक सरकार पाहिली आहेत. कॉंग्रेसचे सरकार पाहिले, विलासरावांचे सरकार बघितले आहे. अशोक चव्हाणांचे सरकार पाहिले. देवेंद्रजींच्या सरकारात मी मंत्री होतो. आताचे सरकारही पाहिले. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आमदाराच्या कोणत्याच पत्रावर सही होत नव्हाती. त्यांच्या खिशात कधीच पेन नसायचा त्यामुळे त्यांनी विकास कामांवर बोलू नये, असे असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

अर्जुन खोतकरांचे जावई आणि प्रसिद्ध क्रिकेटर विजय झोल यांच्यावर फसवणुकीसह गंभीर

Source link

BJP newsbmc electionChandrashekhar Bawankulechandrashekhar bawankule slams uddhav thackerayshiv sena newsUddhav Thackeray
Comments (0)
Add Comment