प्लॅनेट मराठीच्या नव्याने सुरू झालेल्या ‘पटलं तर घ्या’ कार्यक्रमात तेजस्विनीने हजेरी लावली होती. कार्यक्रमात तिला तिच्या आयुष्यातील सगळ्यात चांगल्या आणि वाईट अफेवेबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा बोलताना तेजस्विनी म्हणाली, ‘माझं आणि संजय जाधव याचं अफेअर आहे ही माझ्याबद्दल पसरलेली सगळ्यात वाईट अफवा होती. माझ्यासाठी ही गोष्ट अनपेक्षित होती. संजय दादा आणि माझं अफेअर आहे हे ऐकणं माझ्यासाठी वाईट होतं. कारण मी त्याला दादा म्हणते. तो माझा दादा आहे. आम्ही दोघेही खूप घट्ट आहोत. आमच्यातलं नातं खूप घट्ट आहे. दादा मला त्याच्या मुलीसारखी वागणूक देतो. तो माझ्यात आणि त्याची मुलगी द्वितीमध्ये मुळीच फरक करत नाही. तो मला त्याच्या मुलीप्रमाणे वागणूक देतो. त्यामुळे आमच्या नात्याबद्दल पसरलेली ही अफवा खरंच वाईट होती.’
संजय आणि तेजस्विनी यांनी ‘तू ही रे’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘अनुराधा’ यांसारख्या चित्रपटात आणि वेबसीरीजमध्ये काम केलं आहे. तेजस्विनीचा ‘बांबू’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव यांच्या मुख्य भूमिका आहेत. सोबतच तेजस्विनीदेखील खास भूमिकेत दिसतेय.