सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत रणबीर त्याच्या चाहत्यांसोबत दिसतोय. कॉलेजमध्ये जाणारी काही तरुण मुलं त्याच्या आजूबाजूला दिसयात. यात एक मुलगा त्याच्यासोबत सेल्फी घेत असतो. सेल्फी घेत असताना तो मुलगा अनेकदा मोबाईलमध्ये काही तरी सेटिंग्ज करत असतो आणि पुन्हा सेल्फी घेता, यामुळं रणबीर रागावतो आणि तो या मुलाचा मोबाईल हिसकावून घेतो आणि फेकतो.
रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.या व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पण या व्हिडिओमागंच सत्य काही वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ एका मोबाईल कंपनीच्या जाहिरातीमधला असल्याचं समोर आलं आहे. जाहिरातीचा हा व्हिडिओ नको त्या कॅप्शनसोबत व्हायरल होत असल्यानं नेटकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे.
रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लागोपाठ सिनेमे प्रदर्शित होणार असतील तर तो कलाकार नेहमीच चर्चेत असतो. सध्या असंच काहीसं झालंय रणबीरचं. लग्न, एक-दीड महिन्यांच्या अंतरावर प्रदर्शित झालेले दोन सिनेमे, वडील झाल्याची बातमी अशा सर्व कारणांनी तो चर्चेत आहे.