काही लोकांच्या चुगलखोरी आणि चापलुसीमुळे एखाद्याच्या जीवावर कशी बेतू शकते याचा प्रत्यय एका व्हिडीओ मधून समोर आला आहे. गिरीश नंदलाल चूबे या ३५ वर्षीय एका व्यक्तीने आपल्या बेरोजगारीच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडला आहे. गिरीश याचे लग्न झाले असून त्याला दोन लहान मुले आहेत.
हेही वाचा -जेली चॉकलेट बाळाच्या घशात अडकलं, आईनं प्रयत्नांची शर्थ केली, पण जे व्हायला नको तेच घडलं
आत्महत्या करणारा गिरीश हा उल्हासनगर येथे एका कंपनीत कामाला होता. या कंपनीत काम करणाऱ्या जय आणि विनोद या दोन लोकांनी गिरीशच्या मालकाला चुगली केली आणि त्यामुळे मालकाने गिरीशला जॉब वरुन काढून टाकले होते. याच दोघांमध्ये आपला जॉब गेला आणि त्यामुळे आपल्यावर एक लाखापर्यंत कर्ज झालं असल्याचा आरोप व्हिडीओच्या माध्यमातून गिरीशने केला आहे. या बेरोजगारी आणि कर्जाच्या नैराश्यातून गिरीशने आपण आत्महत्या करत असल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
हेही वाचा -सखूबाईच्या धाडसाने कुटुंब सलामत, अंबरनाथमध्ये बिबट्याचा हल्ला महिलेने परतवला
नैराश्यातून आपल्यावर आत्महत्या करण्याची नामुष्की ओढवल्याचा आरोप गिरीशने केला आहे. आपण कोणाकडून किती कर्ज घेतले आहे याबाबत त्याने व्हिडीओ मध्ये स्पष्ट सांगितल आहे आणि त्या नैराश्यातून तो बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानक दरम्यान ट्रेन खाली उडी घेऊन आत्महत्या करत असल्याचं गिरीशने सांगितलं आहे.
या घटनेत गिरीश याचा मृत्यू झाला असून कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करत आहेत.