वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का दिला नाही; ‘सामना’तून मोदी सरकारला सवाल

मुंबई: प्रजासत्ताक दिनी देशातील अनेक प्रतिष्ठित मंडळींना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यातील बरीच नावे ही संघ परिवाराशी संबंधित आहेत. अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्या मुलायमसिंह यादव यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण केंद्र सरकारला यंदाही वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा विसर पडल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपला वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यापासून कोणी रोखले? तसेच ‘बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा सार्थ अभिमान आणि गर्व आहे’अशी गर्जना करुन अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो. या दोघांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यापासून तुम्हाला कोणी रोखले होते, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

मुलायमसिंह यादव यांच्या राजकारणामुळे उत्तरेत भाजपला फायदा झाला होता. त्याचे ऋण फेडण्यासाठीच भाजप सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला का, असा खोचक सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. १९९० साली झालेल्या अयोध्या आंदोलनात त्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंग यादव यांनी करसेवकांवर निर्घृणपणे गोळया चालवल्या. कारसेवकांच्या रक्ताने तेव्हा शरयू लाल झाली. त्या हत्याकांडानंतर भाजप व संघपरिवार मुलायमसिंग यांचा उल्लेख ‘मौलाना मुलायम’ असा करू लागले. त्यानंतर मुलायम यांनी असेही सांगितले. की, ‘बाबरी मशीद वाचविण्यासाठी आणखी हिंदूना गोळया घालाव्या लागल्या असत्या तरी मागे पुढे पाहिले नसते.’मुलायमसिंग हे समाजवादी चळवळीचे मोठे नेते. राजकारणात, समाजकारणात त्यांचे कार्य मोठेच आहे. पण अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकावर गोळया चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले ते कायमचे, मुलायमसिंग यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता व त्यांचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपास झाला नसता. ते ऋण फेडण्याठीच मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्र’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते, मात्र तसे घडले नाही. मुलायमसिंह यादवांचा गौरव करणारे मोदी शासन वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंना विसरले. लोकांनी या घटनेचे स्मरण ठेवायला हवे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

पद्म पुरस्कार मिळालेले बहुसंख्य संघ परिवाराशी संबंधित

महाराष्ट्र आणि देशात ज्यांना नागरी पुरस्कार मिळाले त्यात बहुसंख्य हे संघ परिवाराशी संबंधित आहेत. कर्नाटकचे कॉंग्रेस नेते एस. एम. कृष्णा यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यात आला. कर्नाटकातील ‘वोक्कालिगा’ समाजावर प्रभाव टाकण्यासाठी कृष्णा यांचा गौरव केला गेला, असे सांगितले जाते. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यासाठी हा खटाटोप करण्यात आला. अनेकजण संघ परिवाराशी संबधित असले तरी आक्षेप घेण्याचे कारण नाही. रमेश पतंगे, भिकुजी इदाते यांचा सन्मान योग्यच आहे. गडचिरोलीच्या झाडीपट्टी रंगभूमीचा कलावंत परशुराम खुणे यांचाही सन्मान सुखावणारा असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

Source link

balasaheb thackeraybharat ratna awardMaharashtra politicsModi govtpadma awards 2023Veer Savarkarपद्म पुरस्कारबाळासाहेब ठाकरेवीर सावरकर
Comments (0)
Add Comment