Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुलायमसिंह यादव यांच्या राजकारणामुळे उत्तरेत भाजपला फायदा झाला होता. त्याचे ऋण फेडण्यासाठीच भाजप सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला का, असा खोचक सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. १९९० साली झालेल्या अयोध्या आंदोलनात त्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंग यादव यांनी करसेवकांवर निर्घृणपणे गोळया चालवल्या. कारसेवकांच्या रक्ताने तेव्हा शरयू लाल झाली. त्या हत्याकांडानंतर भाजप व संघपरिवार मुलायमसिंग यांचा उल्लेख ‘मौलाना मुलायम’ असा करू लागले. त्यानंतर मुलायम यांनी असेही सांगितले. की, ‘बाबरी मशीद वाचविण्यासाठी आणखी हिंदूना गोळया घालाव्या लागल्या असत्या तरी मागे पुढे पाहिले नसते.’मुलायमसिंग हे समाजवादी चळवळीचे मोठे नेते. राजकारणात, समाजकारणात त्यांचे कार्य मोठेच आहे. पण अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकावर गोळया चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले ते कायमचे, मुलायमसिंग यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता व त्यांचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपास झाला नसता. ते ऋण फेडण्याठीच मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्र’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते, मात्र तसे घडले नाही. मुलायमसिंह यादवांचा गौरव करणारे मोदी शासन वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंना विसरले. लोकांनी या घटनेचे स्मरण ठेवायला हवे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
पद्म पुरस्कार मिळालेले बहुसंख्य संघ परिवाराशी संबंधित
महाराष्ट्र आणि देशात ज्यांना नागरी पुरस्कार मिळाले त्यात बहुसंख्य हे संघ परिवाराशी संबंधित आहेत. कर्नाटकचे कॉंग्रेस नेते एस. एम. कृष्णा यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यात आला. कर्नाटकातील ‘वोक्कालिगा’ समाजावर प्रभाव टाकण्यासाठी कृष्णा यांचा गौरव केला गेला, असे सांगितले जाते. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यासाठी हा खटाटोप करण्यात आला. अनेकजण संघ परिवाराशी संबधित असले तरी आक्षेप घेण्याचे कारण नाही. रमेश पतंगे, भिकुजी इदाते यांचा सन्मान योग्यच आहे. गडचिरोलीच्या झाडीपट्टी रंगभूमीचा कलावंत परशुराम खुणे यांचाही सन्मान सुखावणारा असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.