दशक्रिया विधी आटोपला, मात्र घरी परतताना डंपर काळ बनून आला; पुण्यात भीषण अपघात

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील राजुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दशक्रिया विधीवरून घरी परतत असताना एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे. एका भरधाव डंपरने सायकलला जोरात धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात डंपरच्या चाकाखाली आल्याने लक्ष्मण शिवराम हाडवळे (वय ७५, रा. उंचखडक, राजुरी) यांनी आपले प्राण गमावले. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून डंपर चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाडवळे हे उंचखडक येथील राहणारे होते. ते उंचखडक येथून राजुरी गावात दशक्रिया विधीसाठी शुक्रवारी सकाळच्या सुमारास गेले होते. दशक्रिया विधीचा कार्यक्रम उरकल्यानंतर हाडवळे हे सायकलवरून उंचखडक येथे परतताना साडेनऊ वाजताच्या सुमारास राजुरी-उंचखडक रोडवर असणाऱ्या कॅनॉलजवळ त्यांच्या सायकलला एम. एच. १४ एच. जी. ५७७७ डंपरने जोराची धडक दिली. सायकलला धडक बसल्यान त्यांचा तोल गेला आणि ते डंपरच्या चाकाखाली आले. डंपरचे चाक अंगावरून गेल्यामुळे लक्ष्मण हाडवळे यांचा जागीच मृत्यू झाला.

वीजबिलात प्रचंड वाढ होणार; महावितरणने दिला तब्बल ३७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव, शेतकऱ्यांनाही धक्का

याबाबत महेश ज्ञानदेव कणसे यांनी फिर्याद दिली असून त्यावरून डंपरचालक गणेश दत्तात्रय हाडवळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे उंच खडक परिसरात चालकाविरोधात रोष निर्माण झाला होता.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

Source link

accident in pune districtJunnar Accident newsjunnar news todayजुन्नर अपघातजुन्नर ताज्या बातम्यादशक्रिया विधी
Comments (0)
Add Comment