इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने लिहिलं, ‘तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीये पण आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या हिरोसारखा दिसत नसणाऱ्या लूकमुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची फॅन आहे कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. असो. मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःची त्याच्याशी तुलना करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही तो इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही.’
पुढे तिने लिहिलं, ‘सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना थिएटरमध्ये आणणे हे हाच करू जाणे. स्वतःच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए. पन्नाशीनंतर रिटायरमेंटचे प्लॅन करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया.
तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०- २२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला. बाकी, झूमे जो पठान मेरी जान, महफ़िल ही लूट जाए!’ तिची ही पोस्ट नेटकऱ्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक नेटकरी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.