पहाटे डोळा लागला, ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, इनोव्हाचा भीषण अपघात, २ महिला जागीच ठार

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ गोकर्ण महाबळेश्वर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारमधील २ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृत्यू महिलांची नावे आहेत तर कारमधील इतर ६ जण जखमी झाले आहेत.

आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यालगत असणाऱ्या कठड्याला धडकली. गाडीचा वेग एवढा भरधाव होता की गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झालाय. या अपघातात पुण्यातील सराफ व्यावसायिक कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित सहा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीसानी घटनास्थळावरून तात्काळ जखमींना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

Source link

pune banglore roadpune saraf family accidentsatara accidentsatara khambataki tunnel accidentपुणे सराफ कुटुंब अपघातसातारा अपघातसातारा खंबाटकी अपघात
Comments (0)
Add Comment