एकनाथ शिंदे आता अजित पवारांना धक्का देणार, अण्णा बनसोडे शिंदे गटाच्या वाटेवर?

पुणे: पिंपरी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि अण्णा बनसोडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना चांगलेच उधाण आले आहे. अण्णा बनसोडे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवातच राष्ट्रवादी पक्षातून झाली. अण्णा बनसोडे हे सुरुवातीला पानाची टपरी चालवायचे. मात्र, अजित पवार यांनी त्यांना विधानसभेचे थेट तिकीट देऊन आमदार केले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे एकुलता एक आमदारही फुटला तर राष्ट्रवादीला मोठा फटाका बसू शकतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२०१४ ला झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र, २०१९ चा निवडणुकीत अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ते पुन्हा पिंपरी मतदार संघाचे आमदार झाले. त्यांच्या आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतात की काय अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर संमर्थक म्हणून ओळखले जातात. बनसोडे यांनी जर शिंदे गटात प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. कारण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का सहन करावा लागणार आहे. अण्णा बनसोडे यांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी लढवणार, हे आता येणारा काळच स्पष्ट करेल.
शिंदे-फडणवीसांचा जयंत पाटलांना दुसरा धक्का; जिल्हा बँकेची चौकशी होणार
काही दिवसांपासून अण्णा बनसोडे आणि अजित पवार यांचं बिनसले होते. पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढचं तिकीट दुसऱ्या उमेदवाराला दिले जाणार आहे, अशी चर्चा आहे. अण्णा बनसोडे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधीवेळी देखील ते मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे शिंदे गटात गेले तर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे अण्णा बनसोडे शिंदे गटात जातील, अशी चर्चा आता रंगली आहे.
राष्ट्रवादीला झटका!, महेश कोठे हे शिंदे गटाचे आगामी आमदार; मंगेश चिवटेंचा गौप्यस्फोट

कोण आहेत अण्णा बनसोडे?

अण्णा बनसोडे हे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सामर्थ्यशाली नेते आहेत. २००९ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक ते आमदार असा अण्णा बनसोडे यांचा प्रवास राहिला आहे. या काळात अजित पवारांच्या जवळचा नेता म्हणून बनसोडे ओळखले जाऊ लागले होते. मात्र, गेल्या काही काळात अजित पवार आणि अण्णा बनसोडे यांच्यात दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून अण्णा बनसोडे यांनी एकनाथ शिंदे यांना भेटून पर्यायांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे.

Source link

ajit pawaranna bansodeMaharashtra politicsncp mla anna bansodePimpri Chinchwad local newspune local newsअण्णा बनसोडे शिंदे गटात जाणारएकनाथ शिंदे
Comments (0)
Add Comment