MU Exam Postponed: मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कालच या सर्व संघटनांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. दरम्यान २ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या १० परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मधील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासकमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. या परीक्षांना स्थगिती देण्यात आली आहे. अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

या मागण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने २ फेब्रुवारीपासून परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले आहे.

मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी अखेर समिती जाहीर
या आंदोलनामुळे परीक्षाच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने मुंबई विद्यापीठाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ फेब्रुवारीपासूनच्या विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागाचे संचालक प्रमुख, विद्यापीठाशी संलग्नित संचालित महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थाचे संचालक प्रमुख दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे प्राध्यापक नि संचालक, विद्यापीठाच्या रत्नागिरी, ठाणे व कल्याण उपकेंद्रांचे समन्वयक/संचालक यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

स्थगित करण्यात येत असलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेत स्थळावरून प्रसिध्द करण्यात येणार आहे.

पदवी प्रमाणपत्रावरची नावे तपासा, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना आवाहन
Exam Cancelled: ९ वाजता सुरू होणार होता पेपर; ८.३० वाजता मेसेज आला परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांमध्ये संताप

Source link

Maharashtra Timesmumbai universityMumbai University ExamMumbai University Exam PstponUniversity examinationsमुंबई विद्यापीठमुंबई विद्यापीठ परीक्षा स्थगित
Comments (0)
Add Comment