वनिताच्या लग्नात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील एकूण एक कलाकार हजर होता. त्यांनी वनितासाठी छानसा परफॉर्मन्सदेखील दिला. मात्र नेटकऱ्यांना एक गोष्ट खटकली ते म्हणजे ओंकारचं लग्नाला न येणं. हास्यजत्रेमधे ओंकार आणि वनिता यांचे स्किट प्रेक्षकांना प्रचंड आवडायचे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची. मात्र ओंकारने कार्यक्रम सोडला आणि सगळं समीकरण बदललं. वनिताच्या लग्नात ओंकार नाही हे अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत बोलूनही दाखवलं आहे. वनिताने त्याला बोलवलंच नाही का? ओंकार लग्नाला का आला नाही? वनिताचा त्याच्यावरचा राग अजूनही गेला नाही का? आम्हाला त्याला पाहायला आवडलं असतं, तुम्ही निदान मित्र म्हणून तरी त्याला बोलवायला हवं होतं, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
ओंकार न दिसल्याने अनेक नेटकरी नाराज झाले आहेत. वनिताच्या आयुष्याच्या या वळणावर आपल्या चांगल्या मित्राला न बोलावल्याबद्दल नेटकरी वनितावर नाखूष आहेत. ओंकार असता तर आम्हाला आनंद झाला असता असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ओंकार वनिताच्या लग्नाला का आला नाही याचं कारण मात्र समोर आलेलं नाही.