उषा यांनी दिलेल्या या मुलाखतीमध्ये असे म्हटले की कधी घरात असे वाटतच नाही की आता लतादीदी आपल्यात नाहीत. त्या आजही आमच्याबरोबर आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हे वाचा-सिगारेट फॉइलवर लिहिलेल्या ‘ए मेरे वतन’च्या ओळी; वाचा लता दीदींच्या अजरामर गीताची कहाणी
उषा यांनी यावेळी बोलताना असे म्हटले की त्यांचे लतादीदींना त्यांच्या भावाबद्दल खूप आपुलकी होती आणि तेवढाच जीव हृदयनाथ यांचाही लतादीदींवर होता. उषा यांनी बोलताना सांगितले की, दीदींच्या निधनामुळे भाऊ हृदयनाथ एक वर्षापासून धक्क्यातून सावरले नाहीत. दीदी खूप छान जेवण बनवायच्या, गाजराचा हलवा ही त्यांची खासियत होती. उषाजींनी सांगितले की, त्यांच्या जाण्यानंतर आम्ही सर्वांनी गाजराची हलवा खाणे बंद केले आहे. गाजराची हलवा आता कधीच आमच्या घरात खाल्ला जाणार नाही.
धक्क्यातून सावरले नाहीत हृदयनाथ
लतादीदींच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती कशी होती, याविषयी बोलताना उषा म्हणाल्या की, ‘दीदींचे सर्वाधिक प्रेम भाऊ हृदयनाथ यांच्यावर होते. त्यांच्या प्रतीभेला दीदी खूप मान देत असत. भावाच्या पायाच्या दुखण्यामुळेही दीदींना खूप त्रास व्हायचा. दीदी आजही त्यांच्यासोबत आहेत.’ उषाजींनी सांगितले की या धक्क्यातून हृदयनाथ यांना सावरणं कठीण जात आहे. गेल्या वर्षभरापासून ते आजारी असून सर्व कुटुंब त्यांना या धक्क्यातून सावरायला मदत करतंय.