भाजपने डावललं, पण काँग्रेसने टिळकांना जवळ केलं; रवींद्र धंगेकर केसरीवाड्यात जाऊन म्हणाले…

Authored by आदित्य भवार | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Feb 2023, 4:28 pm

Congress candidate kasba byelection | पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

 

कसबा पेठ पोटनिवडणूक

हायलाइट्स:

  • काँग्रेसचा उमेदवार टिळक कुटुंबीयांच्या भेटीला
  • रवींद्र धंगेकर यांनी टिळक कुटुंबीयांना दिलं आश्वासन
  • ‘मुक्ता टिळक यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करेन’
पुणे: कसबा पेठ पोटनिवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सोमवारी भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीचा अर्ज भरला आहे. त्यापूर्वी रवींद्र धंगेकर यांनी सकाळी उठल्या बरोबर केसरी वाड्यात जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मुक्ता टिळक यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन टिळक कुटुंबीयांना दिले. त्यासोबत लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कसबा गणपतीच दर्शन घेतलं. रवींद्र धंगेकर यांचा हा पहिला भावनिक डाव मानला जातो. कारण मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातला दोन्ही इच्छुक सदस्य पैकी कोणालाही उमेदवारी दिली नाही, म्हणून शैलेश टिळक यांनी खंत व्यक्त करून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना मोठी विषय मिळाला आणि रवींद्र धंगेकर याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसत आहे.

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांनी AB फॉर्म भरला आहे. त्याचसोबत ग्रामदैवत कसबा गणपतीसमोर जोरदार शक्ती प्रदर्शन या दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आले. मात्र, हेमंत रासनेच्या जल्लोषात टिळक कुटुंबीयांपैकी एकही सदस्य सहभागी झाला नव्हता. त्यामुळे टिळक कुटुंबीयाची नाराजी ही उघडपणे दिसत आहे. टिळक कुटुंबीयांवर अनेकदा अन्याय झाला आहे. कसब्यातील मतदार याचा बदला नक्की घेतील, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
कसब्यातील ब्राह्मण मतदार नाराज, भाजपला धडा शिकवण्यासाठी पुण्यातील ‘ही’ बहुचर्चित व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यातील पोटनिवडणूक बिन विरोध कराव्या अशी भूमिका भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे. मात्र, भाजपने टिळक कुटुंबीयांतील सदस्यांना उमेदवारी दिली नसल्यामुळे अनेकजण नाराज झाले. भाजपला मुक्ता टिळक यांच्या कार्याचा विसर पडल्याची टीका अनेकजण करत आहेत. कसबा पेठ मतदारसंघात २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी भावनिक साद घालून आपल्या मतांची बेरीज करायला सुरुवात आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना या सगळ्याचा फायदा होणार का, हे येणारा काळच स्पष्ट करेल.
Kasba Bypoll: गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते नगरसेवक, कसब्यात भाजपने हेमंत रासनेंना उमेदवारी का दिली?

कसबा पेठेतील बॅनर्सची जोरदार चर्चा

कसबा पेठ मतदारसंघातील अनेक वर्षांची परंपरा मोडत भाजपने यंदा ब्राह्मण समाजाबाहेर उमेदवार दिला आहे. कसब्यात सध्या याचे तीव्र राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटताना दिसत आहेत. कसबा पेठ परिसरात अज्ञात व्यक्तींकडून लावण्यात आलेले बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

congress candidate kasba byelectionkasba bypollkasba ganapati in punekasba peth brahmin vote bankpune local newsravindra dhangekarravindra dhangekar meets tilak familyकसबा पोटनिवडणूकटिळक कुटुंब शैलेश टिळक कसबा पेठरवींद्र धंगेकर
Comments (0)
Add Comment