Devendra Fadnavis talk with Tilak family in Pune | कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून आपला उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे. हेमंत रासने यांच्याऐवजी टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी मिळण्याची शक्यता.
हायलाइट्स:
- कसब्यातील ब्राह्मणवृंदाच्या दबावपुढे भाजप पक्ष झुकला?
- टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची भाजपची तयारी
आज दिवसभरातील राजकीय घडामोडींनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही हे संध्याकाळी टिळक परिवाराचे निवासस्थान असलेल्या केसरीवाडा येथे गेले होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शैलेश टिळक यांची समजूत काढली. यानंतर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, टिळक कुटुंबीय आमच्यावर कधीच नाराजी होऊ शकत नाहीत. मुक्ता टिळक आमच्या नेत्या होत्या. टिळक कुटुंबीय नाराज असल्याचा कल्लोळ काही लोक करत आहेत, पण कोणीही नाराज नाही. अनेक मंत्री याठिकाणी येतात, त्यामुळे मीदेखील केसरीवाड्यावर आलो नाही. भाजपमध्ये कोणालाही जाणीवपूर्वक डावलले जात नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी देऊ, पण आधी महाविकास आघाडीने उमेदवार मागे घ्यावा: बावनकुळे
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी देण्यास तयार असल्याचे सांगितले. उद्या तीन वाजेपर्यंत महाविकास आघाडीने कसब्याची निवडणूक बिनविरोध केली तर आम्ही उद्या हेमंत रासने यांना उमेदवारी अर्ज मागे घेऊ. एका वर्षासाठी जनतेवर निवडणूक लादू नये. त्यामुळे काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. आमची कागदपत्रं तयार आहेत, फॉर्म तयार आहेत. टिळक परिवाराला आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे पण त्यांच्याकडून (महाविकास आघाडी) तसे पाऊल उचलले जावे. कुणाल टिळक, गणेश बिडकर, धीरज घाटे हे सगळेच ताकदवान उमेदवार आहेत. पण एका जागेवरून सर्वजण लढू शकत नाहीत. यापैकी कोणीही उभे राहिले तरी १०० टक्के निवडून येईल. त्यामुळे टिळक परिवार किंवा कोणालाही डावलण्याचा प्रश्नच येत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.