काँग्रेसला सोयीनुसार वापरण्यापेक्षा…; व्यथित थोरातांना विखेंनी डिवचले

अहमदनगर : भाचा आमदार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून स्वत:च्या पक्षातील संघर्षामुळे व्यथित झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही निशाणा साधला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने व्यथित झाला आहात का? असा उपरोधिक बोचरा सवाल विखे पाटील यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका मांडा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा, असे थेट आव्हानही विखे पाटील यांनी थोरातांना दिले आहे.

ही निवडणूक संपेर्यंत मौन बाळगलेल्या थोरात यांनी काल आपली भूमिका प्रथमच मांडली. त्यावरून काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि थोरात यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. विखे पाटील म्हणाले, पदवीधर निवडणुकीत कोणतीच भूमिका स्पष्ट न करणाऱ्या थोरातांनी काँग्रेस पक्षाला सोयीनुसार वापरण्यापेक्षा भूमिका स्पष्ट केली पाहिजे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणून तुम्ही व्यथित आहात काॽ काँग्रेस पक्षाची भूमिका मांडा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा.

क्लिक करा आणि वाचा- VIDEO : डोकंच चक्रावतं! चक्क उंदराने चोरला महागडा हिऱ्याचा हार, पाहा कशी केली चोरी

विखे पाटील यांनी दिला इशारा

तुम्ही काँग्रेस पक्षाला सोयीनुसार वापरू शकत नाही. नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत मुळातः थोरात व्यथित झाले आहेत. त्यांच्या संगमनेर तालुक्यातील जनता त्यांना सोडून चालली आहे. त्यांच्या तालुक्यातील चार महत्वपूर्ण गावांच्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाले त्यामुळेच थोरात व्यथित झाले आहेत. वाळू माफीयांवरील कारवाईचे राजकीय भांडवल करून तुम्ही जनतेला भावनिक साद घालत असाल तर जनता एवढी दूधखुळी नाही, असा इशाराही विखे पाटील यांनी दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- विश्वासू ड्रायव्हरला शिकवायचा होता मालकाला धडा, बेडरूमची डुप्लिकेट चावी बनवून साधला डाव, फुटले बिंग

वाळू माफिया आणि ठेकेदारांनी काढलेल्या मोर्चाला दवाखान्यात असतानाही फोनवरून तुम्ही मार्गदर्शन करता मग पदवीधर निवडणुकीत सुध्दा महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत भूमिका का स्पष्ट का केली नाही? याबाबतही थोरातांनी बोलले पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले. सत्यजित तांबेंबाबतचा विषय संपला कारण आता निवडणूकही संपली आहे. भाजपने दिलेल्या पाठींब्यामुळे निवडून आले. उद्याच्या काळात त्यांनी पक्षाच्या भूमिकेसोबत राहावे एवढीच आमची अपेक्षा आहे, असेही विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

क्लिक करा आणि वाचा- डॉक्टर नव्हे हैवान! ऑपरेशनच्या नावाखाली गुपचूप काढल्या दोन्ही किडन्या, पीडित महिलेची मृत्यूशी झुंज सुरू

जितेंद्र आव्हाड यांना टोला

राष्ट्रवादीचे आमदार म्हणून जितेंद्र आव्हाड हे सातत्याने आपली भूमिका स्पष्ट करीत असतात. ते शरद पवार यांच्या जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्यांनी मांडलेली भूमिका ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मान्य आहे का? हे पण तपासून घेतले पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले.

Source link

Balasaheb Thoratradhakrishna vikhe patilSayajeet Tambeबाळासाहेब थोरातराधाकृष्ण विखे-पाटीलसत्यजीत तांबे
Comments (0)
Add Comment