पठाण चित्रपटामुळं गेल्या ३२ वर्षांत आतापर्यंत जे झालं नव्हतं ती गोष्ट घडून आली आहे. ती गोष्ट म्हणजे पठाण पाहण्यासाठी काश्मीरमधल्या सिनेगृहांत गर्दी झाली होती. अनेक थिएर्टसमध्ये हाऊसफुलचे बोर्ड लागल्याचं चित्र होतं. अस चित्र गेल्या काही वर्षांत तरी पाहण्यात आलं नव्हतं. पण पठाणमुळं ते शक्य झालं. सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. असं असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतंय. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाण चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहेत.
पठाणबद्दल काय म्हणाले PM Narendra Modi?
‘श्रीनगरमध्ये दशकांनंतर थिएटर्स हाऊसफुल होतायत.’ या एका ओळीनं ‘पठाण’च्या चाहत्यांना वेड लावलंय. हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्ष का होईना पण कौतुक केलंय, असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यांनी चित्रपटांवर बोलणं टाळायला हवं, असं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी कोणत्याही अभिनेत्याचं किंवा चित्रपटाचं नाव घेतलं नव्हतं. भाजपच्या काही नेत्यांनी ‘पठाण’च्या बेशरम गाण्यावर आक्षेप घेतला होता.
बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
पठाणचे आत्तापर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहाता चित्रपटानं अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. १३ व्या दिवशी पठाण चित्रपटानं सुमारे ९.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. पण आता नवीन आकडे आलेत त्यावरून चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचं दिसून येत आहे.