पठाणमध्ये कशी झाली सलमान- डिंपल कपाडियांची एण्ट्री, दिग्दर्शकाने अखेर सांगूनच टाकलं

मुंबई : पठाण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्यांदा सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यानं त्याचं मत व्यक्त केलं आहे. अनुपमा चोप्रा हिच्याशी डायरेक्टर्स ‘कट बाई फिल्म कम्पॅनियन’मध्ये तो सहभागी झाला होता. त्यात त्यानं शाहरुख खान, सलमान खानला दिग्दर्शित करण्याचा अनुभव आणि त्या दोघांना घेऊन प्रेक्षकांकडून शिट्ट्या आणि टाळ्या घेणारे पठाण सिनेमातील (Pathaan ) सीन कसे तयार केले याचे अनुभव सिद्धार्थनं सांगितला.

पुन्हा एकदा प्रसाद ओकची एकनाथ शिंदेंसाठी पोस्ट, तीन फोटोंमधून दिसलं एकमेकांसोबतचं नातं
सिद्धार्थ आनंदनं पठाण सिनेमामधील क्लायमॅक्स सीन कसे केले त्यावर या मुलाखतीमध्ये मोकळेपणानं भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, ‘लोकांची आवड, त्यांच्याकडून येणाऱ्या शिट्ट्या, टाळ्या लक्षात घेऊन पठाण सिनेमा केला. याआधी मी केलेला सिनेमा असा नव्हता. तुम्हाला वॉर सिनेमातील कोणताही डायलॉग आठवणार नाही, परंतु पठाण सिनेमा मात्र सर्वांपेक्षा वेगळा आहे. हा कमर्शिअल मास एंटरटेनर बनवला. जेव्हा शाहरुख सावलीतून बाहेर येतो आणि म्हणतो की, ‘जिंदा है हम…’ तेव्हा सेटवरदेखील टाळ्यांचा कडकडाट झाला होता.’

थेट बोलून गेले! विवेक अग्निहोत्रींवर भडकले प्रकाश राज, ऑस्कर काय भास्करही मिळणार नाही
सिद्धार्थने सलमान आणि शाहरुखसोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितलं की, ‘त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला हे करायचेच आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं. आम्हाला माहिती होतं की सलमान खान टायगरच्या रुपात यावं त्यातून आम्ही क्रॉसओव्हर करू शकू. खरं सांगायचं तर प्रत्येक दिग्दर्शकाला माहिती असतं की त्याच्या सिनेमात त्याला काय करायचं आहे. सिनेमाच्या शेवटी तो क्लायमॅक्समधून ते सांगत असतो. मला मात्र असं व्हायला नको होतं. मला वाटत होतं की, सिनेमाच्या शेवटी नायकाला त्याची खरी जागा मिळेल आणि ती त्यानेच मिळवली हे त्याला माहिती असेल.’

पठाण सिनेमात डिंपल कपाडिया आधी नव्हती

तुम्हाला माहिती आहे का, डिंपल कपाडिया पठाण सिनेमाचा भाग नव्हत्या. त्याबद्दल सिद्धार्थनं सांगितलं की, ‘खरं तर ही भूमिका डिंपल कपाडिया यांच्यासाठी लिहिलेली नव्हती. ती कुमुद मिश्रा यांच्यासाठी लिहिलेली होती, परंतु एका रात्री कुमुद मिश्रा यांच्याशी बोलायला जात होतो तेव्हा मी टेनेट सिनेमा पाहिला. त्यात डिंपल यांनी खूपच सुंदर काम केलं आहे. त्यामुळे या सिनेमातील व्यक्तिरेखा पुरुषा ऐवजी महिलेची केली. कारण शाहरुख आणि महिला हे समीकरण नेहमीच शानदार ठरलं आहे.’

Source link

dimple kapadiapathaan moviesalman khanshah rukh khansiddharth anandडिंपल कपाडियाशाहरुख खानसलमान खानसिद्धार्थ आनंद
Comments (0)
Add Comment