नांदेड : नांदेड शहराच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुरी चौक माळटेकडी परिसरात एक धक्कादायक उघडकीस आली आहे. खाण्यापिण्याच्या वादावरून चक्क मित्रानेच मित्रावर गावठी कट्ट्यातून फायरिंग केली असल्याची घटना घडली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवार दिनांक नऊ फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
नांदेड शहराच्या माळटेकडी परिसरातील नुरी चौक भागात शेख इरफान शेख गुड्डू (वय २५, रा. मगदूमनगर, नई आबादी नांदेड) आणि त्याचा मित्र पार्टी करत बसले होते. थोड्यावेळात खाण्यापिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपी मित्राने शेख इरफान शेख गुड्डू याच्यावर आपल्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून फायरिंग केली. यात शेख इरफान याच्या पोटाला गोळी लागली आहे.

या घटनेची माहिती समजताच विमानतळाचे पोलीस अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. जखमी शेख इरफान याला विष्णुपुरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय सूत्राने सांगितले. शहराच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन फायरिंगच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा नांदेड शहरामध्ये विमान ठाण्याच्या हद्दीत फायरिंगची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.