दीपक दिनकरराव सुकळीकर (वय ३५ , राहणार- भुकूम, तालुका- मुळशी) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे राजगड किल्ल्यावर एकच शोककळा पसरली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजगड किल्ल्यावर दीपक हा त्याच्या काही मित्रांसोबत फिरायला आला होता. किल्ल्यावर गर्दी असल्याने दीपक हा किल्ल्यावरून खाली येत असताना चक्कर येऊन पडला. याची माहिती काही व्यक्तींनी पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर लगेच पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घतेली.
चक्कर आलेल्या व्यक्तीला स्ट्रेच्रच्या सह्याने राजगडाच्या जवळ असलेल्या खंडोबा माळ येथे आणले गेले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी वेल्हे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
गडावर प्रथमोपचाराची काहीच व्यवस्था नाही
किल्ले राजगड व तोरणा गडावर पर्यटकांची वरदळ दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु प्राथमिक उपचाराचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध नसून स्ट्रेचरची सुद्धा दुरवस्था झाली आहे. पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी तातडीने या सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात आली आहे. पर्यटकांनी देखील फिरायला येताना स्वतच्या काळजी घेऊन यावे तसेच आपल्याला आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रेकिंग करावी असे आवाहन करण्यात आले आहे.