तरुणांसाठी संधी
राज्यातील तरुणांना त्यांच्या उर्जा, धैर्य, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून नवनवीन संकल्पना राबविण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे हा या फेलोशिपचा उद्देश आहे. यासोबतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना धोरणनिर्मिती, नियोजन, कार्यक्रम अंमलबजावणी यासंदर्भातील महत्त्वाचा अनुभवही मिळू शकणार आहे. २०१५ ते २०२० या कालावधीत यशस्वी अंमलबजावणीनंतर दोन वर्षांचे अंतर पडले. आता हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
पात्रता
मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते २६ वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांना ग्रॅज्युएशनमध्ये ६०% गुण आणि किमान एक वर्षांचा अनुभव असावा. ऑनलाइन चाचणी, निबंध आणि मुलाखत यासारख्या त्रिस्तरीय चाचणीद्वारे गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. प्राप्त अर्जांमधून ६० तरुणांची मुख्यमंत्री फेलो म्हणून निवड केली जाईल. हे सर्वजण राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील.
आयआयटी, मुंबई आणि आयआयएम, नागपूर हे या कार्यक्रमाचे संस्थात्मक भागीदार (शैक्षणिक भागीदार) आहेत. फेलो या दोन्ही संस्थांमार्फत सार्वजनिक धोरणाशी संबंधित विविध विषयांचे अभ्यासक्रम पूर्ण करतील. यासाठी त्यांना आयआयटी, मुंबई आणि आयआयएम, नागपूर येथून स्वतंत्र पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती अधिकृत वेबसाइट cmfellowship-mah@gov.in वर उपलब्ध आहे.
तसेच यासाठी ८४११९६०००५ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. २ मार्च २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा