धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन भाजपचा ठाकरे सरकारवर आरोप; कोण आहे हा माणूस?

धुळे: राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भारतीय जनता पक्षानं धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन गंभीर आरोप केला आहे. ‘हे सरकार शेतकऱ्यांचं रक्षणकर्ते नसून धर्मभास्कर वाघ याच्या सारख्यांचे आश्रयदाते आहे,’ अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळं धर्मभास्कर वाघ याचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (BJP MLA Ashish Shelar Attacks Maha Vikas Aghadi)

‘आशिष शेलार हे तीन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून धुळ्यात आज त्यांनी पक्षसंघटनेचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार धर्मभास्कर वाघ याची राज्यातील जनतेला सतत आठवण व्हावी आणि घोटाळ्यांमध्ये धर्मभास्करचे बाप निघावेत असे एक एक चेहरे ठाकरे सरकारच्या काळात उघड होत आहेत. धर्मभास्करही तोंडात बोटं घालेल असं सध्याचं चित्र आहे,’ असं शेलार म्हणाले.

वाचा: ‘राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही’

‘पोलीस यंत्रणेचं कधी नव्हे इतकं खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात झालं आहे. अधिकऱ्यांमध्ये वॉर सुरू आहे. बार, पब, डिस्को, लेडीज बार आणि काळे धंदे राजरोस सुरू आहेत. दलालांमार्फत बदल्या आणि बदल्यांची दलाली घेणे सुरू आहे. आता चाईल्ड प्रोनोग्राफी सारखे भयंकर प्रकार उघड होत आहेत,’ असंही ते म्हणाले.

‘राज्यातील प्रशासकीय यंत्रणा पुरती कोलमडली आहे. आएएस दर्जाचे अनेक वरिष्ठ अधिकारी अनेक दिवस नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर सतत बदल्या करून अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यात आलं आहे. ‘तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी’ अशी राज्याची स्थिती असल्याचा टोला शेलार यांनी हाणला.

वाचा: राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर; भाजपची ‘ही’ प्रतिक्रिया

‘कुणी कुणाचे ऐकत नाही. राज्य शासनाच्या दिशाहीन कारभारामुळं राज्याची दिशा कोणती हेच कळत नाही. सत्तेतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात. एकमेकांच्या पक्षप्रमुखांविषयी वक्तव्य येतात, त्यावरून वाद होतात. तीनही पक्षांमध्ये बेदिली माजलेली आहे, यातून नेतृत्वाची बेअदबी होत आहे,’ याकडं शेलार यांनी लक्ष वेधलं.

Source link

Ashish shelar attacks maha vikas aghadi governmentAshish Shelar in Dhule NewsAshish Shelar on Thackeray Government UpdateDharmaBhaskar Waghआशिष शेलारधुळेमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment