कसबा पोट निवडणूक प्रचार; वाहन चालकावर संशय, तपासणी करताच पाच लाखांची रोकड सापडली…

पुणे: कसबा पोट निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी आणि पोलीस चेक पोस्टवर गाड्यांचा तपास करत असताना एका गाडीमध्ये पाच लाखाची रोकड आढळून आली आहे. तात्काळ कारवाई करत स्वारगेट पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांनी ही रोकड जप्त केली आहे. याबाबत पोलिसांनी वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली. कारवाई करत गाडी जप्त करून चालकाला ताब्यात घेतलं आहे. हे पैसे कशासाठी वापरले जाणार होते, याची माहिती अजून मिळाली नाही. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता अधिक सतर्क झाली आहे.

कसबा आणि चिंचवडमध्ये येत्या २६ फेब्रुवारी रोजी पोट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या दोन्ही ठिकाणी विजयासाठी भाजप आणि मविआकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यात काल उपमुख्यमंत्री द्रवेंद्र फडणवीसांनी सात तास बैठका घेतल्याने भाजपनं विजयासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांना पाच लाखांची रोकड सापडली आहे.

आढळून आलेल्या रकमेनंतर निवडणूक अधिकारी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये याबाबत अधिक चौकशी करत आहेत. ज्या गाडीत ही रक्कम आढळून आली आहे, त्या गाडी चालकाकडे पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मात्र, चालकाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने निवडणुकीसाठीच ही रोकड आणली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जर ही रक्कम वाटण्यासाठी आणली असल्यास यातील काही रक्कम वाटण्यात आली आहे का, याचा तपास पोलीस करत असून, ऐन मतदानापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Source link

bjp capaign for kasba bypollcash seized during election campaignkasba bypollkasba bypoll campaignPune crime newspune live newsPune newsswargate policeकसबा पोट निवडणूकपुणे न्यूज
Comments (0)
Add Comment