गुगल इंडियाने कर्मचारी कपातीबाबत लिंक्डइनवर पोस्ट करणे सुरू केले आहे. आम्हाला कपातीचा फटका बसला असून आम्ही डिजिटल मार्केटिंगच्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलत आहोत असे हरियाणातील गुरुग्राममधील गुगलचे व्यवस्थापक कमल दवे यांनी लिंक्डइनवर पोस्टमध्ये म्हटले आहे.
गुगलमधील आणखी एक कर्मचारी प्रोग्राम मॅनेजर, सप्तक मोहंता, यांनी लिंक्डइनवर पोस्ट केली आहे. काल रात्री सिंगापूर आणि भारतात गुगलच्या कपातीचा भाग म्हणून माझ्या अनेक सहकारी आणि मित्रांनी त्यांच्या नोकर्या गमावल्याचे पाहून निराश झालो. यातून सावरण्यासाठी प्रत्येकाला थोडा वेळ लागेल.गेल्या महिन्यात, टेक क्षेत्रातील प्रचंड कपातीच्या दरम्यान, गुगलने १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजनाही जाहीर केली होती.
या कर्मचारी कपाती संबंधित निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेत आहे, असे कर्मचार्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले.आमचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी, कॉस्ट बेसमध्ये बदल करण्यासाठी आणि आमचे टॅलेंट आणि भांडवलास आमची सर्वोच्च प्राधान्य बनवण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण असल्याचेही ते म्हणाले.
गुगलने दिलेल्या माहितीनुसार, ही कर्मचारी कपात जागतिक आहे आणि यूएस कर्मचार्यांवर त्याचा तात्काळ परिणाम होईल. खर्चात कपात करण्याच्या एक भाग म्हणून उच्च अधिकार्यांच्या पगारात कपात केली जाईल, असेही पिचाई यांनी सांगितले.