SSC HSC Exam: ‘कॉपीमुक्ती’साठी भरारी पथक सज्ज

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रांवर कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी ठाणे जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात अद्याप एकही केंद्र संवेदनशील नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

करोनाकाळात त्या-त्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. मात्र आता दोन वर्षांच्या कालावधीनंतर, दहावी आणि बारावीची परीक्षा पूर्वीप्रमाणे वेगवेगळ्या केंद्रांवर घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होत आहे. १७३ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून परीक्षेसाठी एक लाख चार हजार ५६१ विद्यार्थी बसले आहेत. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा ३३२ केंद्रांवर होणार असून एक लाख १६ हजार ५४२ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.

SSC HSC Exam: दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचे होणार निरसण, ‘या’ क्रमांकांवर साधा संपर्क
या परीक्षा कालावधीत परीक्षा केद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारच्या विविध विभागांच्या समन्वयातून ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत, याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे उद्बोधन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चार भरारी पथक नेमण्यात आली आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय भरारी पथकेदेखील स्थापन करण्यात आली आहेत.

दहावी परीक्षा

कालावधी २ ते २५ मार्च २०२३

एकूण परीक्षार्थी १ लाख १६ हजार ५४२

एकूण केंद्रे ३३२

बारावी परीक्षा

कालावदी २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३

एकूण परीक्षार्थी १ लाख ०४ हजार ५६१

एकूण केंद्रे १७३

HSC Exam: उद्यापासून बारावीची परीक्षा, विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेबद्दल जाणून घ्या
HSC Exam: बारावी परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्रावर कलम १४४ लागू, उल्लंघन केल्यास होणार मोठी कारवाई

Source link

10th exam10th standard exam timetable12th Examcopy free campaignhigher secondary school certificateHSC Examhsc exam date 2023hsc exam timetable 2023HSC SSC Exam Timetable 2023secondary school certificate examSSC ExamSSC exam centersssc exam date 2023ssc exam timetable 2023SSC HSC Examएसएससी दहावी परीक्षा वेळापत्रक २०२३कॉपीमुक्तीदहावी परीक्षाबारावी एचएससी परीक्षा वेळापत्रक २०२३बारावी परीक्षा
Comments (0)
Add Comment