याआधी एनटीएने जेईई मेन पेपर २ साठी उत्तरतालिका जाहीर केली होती. पुढे देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करुन विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू शकतात.
JEE Main Result: पुढील स्टेप्स करा फॉलो
स्टेप १- जेईई मुख्य पेपर २ चा निकाल पाहण्यासाठी, अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
स्टेप २- होमपेजवर तुमची क्रेडेन्शियल्स टाकून लॉगिन करा.
स्टेप ३- लॉगिन केल्यानंतर सबमिट करा.
स्टेप ४- सबमिट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
स्टेप ५- निकाल तपासा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंटाउट घ्या.
सत्र २ ची परीक्षा एप्रिलमध्ये
यावर्षी जेईई मुख्य पेपर २ हा २८ जानेवारी २०२३ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात आला होता. निकाल जाहीर करण्यापूर्वी, NTA ने अधिकृत वेबसाइटवर पेपर २ साठी उत्तरतालिका जारी केली होती. पेपर २ मध्ये निवडलेले सर्व विद्यार्थी बॅचलर इन आर्किटेक्चर आणि बॅचलर इन प्लॅनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतील. जेईई मुख्य सत्र २ ची परीक्षा ६,७,८,९,१०,११ आणि १२ एप्रिल रोजी घेतली जाईल.
निकालाच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा