अभिजित बिचुकले बिग बॉस सीझन १५ चे स्पर्धक आहेत. त्यांनी वाईल्ड कार्डद्वारे शोमध्ये प्रवेश केला होता. शोच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्या स्वभावामुळे ते चर्चेत होते. अभिजित बिचुकले बिग बॉस मराठी सीझन २ मध्ये देखील दिसले. मात्र काही वादांमुळे त्यांना शोमधून बाहेर पडावे लागले.
अभिजित बिचुकले हे सातारा जिल्ह्यातल्या बिचुकले गावचे आहेत. अभिजित जयसिंगराव आवाडे बिचुकले असे त्यांचे पूर्ण नाव आहे. २८ डिसेंबर १९७६ रोजी बिचुकले गावात त्यांचा जन्म झाला आणि येथूनच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.
तर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापुरात आले होते आणि येथील शिवाजी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याचे समजते. त्याचवेळी त्यांनी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातूनही शिक्षण घेतले. १९९७ मध्ये कोल्हापुरच्या शिवाजी विद्यालयातून ते पदवीधर झाले. त्यानंतर २००१ साली साताऱ्याच्या लाल बहादुर शास्त्री कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन ऑनर्ससह पदवी मिळविली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सातारा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली. महापालिका निवडणुकीतही त्यांनी सहभाग घेतला आहे. आपण कवी, गायक आणि संगीतकार असल्याचे ते सांगतात.
अभिजित बिचुकले यांना एक दिवस देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती व्हायचे आहे. याबद्दल ते सतत माध्यमांना सांगत असतात.